Tuesday, July 23, 2024
Homeधुळेअक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद

अक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद

धरण शंभर टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहण निधीची व्यवस्था करा -आ.कुणाल पाटील

धुळे | प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानभवनात अक्कलपाडा संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाचे आज पडसाद उमटले. नेर (ता.धुळे) येथे विविध मागण्यांसाठी अक्कलपाडा संघर्ष समितीतर्फे शेतकर्‍यांनी दि.८ जूलै रोजी नागपूर- सुरत महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनकर्त्यांचा आवाज आ.कुणाल पाटील यांनी विधानभवनात मांडला.
धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी १९८ हेक्टर अतिरिक्त भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्‍या जमीन अधिग्रहणासाठी शेतकर्‍यांना मोबदला म्हणून २०० ते २५० कोटी रुपयांची आवश्यता आहे. आज हे धरण केवळ ६० टक्केच भरले जात आहे. म्हणून अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी लागणार्‍या निधीची शासनाने तत्काळ तरतूद करावी, अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी आज विधानभवनात केली.

- Advertisement -

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरावे आणि अक्कलपाडा संघर्ष समितीच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात, या मागणीसाठी आ.कुणाल पाटील यांनी आज दि.९ जुलै रोजी अधिवेशनात आवाज उठविला. आ.कुणाल पाटील म्हणाले की, अक्कलपाडा धरणाचे बांधकाम आज पूर्णपणे झाले आहे. परंतु हे धरण फक्त ६० टक्केच भरले जात आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सुमारे १९८ हेक्टर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाची गरज आहे. त्यासाठी संपादित होणार्‍या जमीनीचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यासाठी सुमारे २०० ते २५० कोटी रुपये निधीची गरज आहे. हा निधी सरकारने दिला नाही म्हणून आज अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरले जात नाही, असे त्यांनी सांगितले.

अग्रवालांची परवानगी रद्द करा- अक्कलपाडा धरणावरुन शिरधाणे (ता.धुळे) येथील शिवारात औद्योगिक वापरासाठी पाणी उचलण्याची परवानगी अनमोल अग्रवाल नामक व्यक्तीने घेतली आहे. मात्र त्या ठिकाणी सदर व्यक्ती इंडस्ट्री उभी न करता आज तो व्यक्ती तेथे शेती करीत आहे. त्यामुळे त्याचा पाणी वापर हक्क रद्द करावा, अशीही मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या