Monday, June 24, 2024
Homeराजकीयअजित पवार यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही- राज ठाकरे

अजित पवार यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही- राज ठाकरे

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुणे येथे सभा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. त्यानंतर, लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा झाली. पावसाचे सावट असल्यामुळे आजची सभा होईल की नाही, असा संभ्रम होता. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानी नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने राज ठाकरेंची सभा सुरू झाली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला जेम्स लेन प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचं राजकारण वाढल्याचा पुनरुच्चारही राज ठाकरेंनी केला. विदेशी बाई म्हणून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, असे बोलत शरद पवारांना लक्ष्य केलं. तर अजितदादांबद्दल माझे अनेक मतभेद असतील, पण त्यांनी कधी जातीपातीचा भेद केला नाही. शरद पवारांसोबत राहूनही जातीपातीचं राजकारण केलं नाही. असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला .

या वेळेची ही पहिली निवडणूक आहे, ज्याला विषयच नाही. महाराष्ट्र हा कधी असा नव्हता. काही जणांची भाषणं पाहिली. या सर्व गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात. भाषणांमधून शिव्या देणारा महाराष्ट्र कधी नव्हता. या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये गुंतवून ठेवलय. आज तरुण तरुणी त्यांच्या भविष्याचा विचार करत आहेत. त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करत आहेत. तर पुणे हे विद्ववानांचं शहर आहे, तरुणाईचं शहर आहे, मोठा संस्कृती वारसांचं हे शहर आहे. जगभरातील अनेक कंपन्यांना या शहराने विद्वान दिले आहेत. त्यामुळे, अशा एका पुणे शहरात, पुन्हा सत्तेत बसणाऱ्या पक्षाची उमेदवारी मुरलीधर यांना मिळाली आहे, म्हणून मी आज पुण्यात सभा घेत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या