Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमआक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ व्हायरल करीत केले ब्लॅकमेल

आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ व्हायरल करीत केले ब्लॅकमेल

नाशिक जिल्ह्यातील नराधमास धुळे सायबर पोलीसांनी केले जेरबंद ; हॉटेल चालकालाही केले सहआरोपी

धुळे (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीला आधी प्रेमाच्या जाळयात ओढले. तिला धुळे जिल्ह्यातील हॉटेलवर नेत तिच्याशी संबंध ठेवले. कालांतराने वादविवाद झाल्याने त्यांचे ब्रेकअप झाले. पिडीत मुलीने ब्लॉक केल्याने त्या तरुणाने सुडाच्या भावनेतून मुलीचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत तक्रार प्राप्त होतात सायबर पोलिसांनी नराधम संशयीत आरोपीला जेरबंद केले. दरम्यान या गुन्हात तरुणासह पीडितेला खोली देणाऱ्या धुळ्यातील हॉटेल चालकालाही आरोपी करण्यात आले आहे.

स्नॅपचॅटवरून ओळख व प्रेम- नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणेतील रहिवासी असलेला व महाविद्यालयीन शिक्षक घेत तरूणाची दोन वर्षापुर्वी अल्पवयीन मुलीशी स्नॅपचॅट या सोशल मिडीयावर ओळख झाली होती. हळुहळु ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सुमारे एक वर्षापुर्वी तरुणाने पीडितेला धुळे जिल्हयातील एका लॉजमध्ये नेवून (आरोपी लॉज यास ओयो या नावानो संबोधतो) तिच्याशी संबंध प्रस्थापीत केले. तसेच तिच्या संमतीशिवाय तिचे फोटो व व्हीडीओ चित्रीकरण केले.

- Advertisement -

ब्लॉक केल्याने फोटो, व्हिडिओ केले व्हायरल- कालांतराने त्याच्यात वाद विवाद झाल्याने त्यांचे ब्रेकअप झाले. पिडीतेने आरोपी तरुणाला सोशल मिडीयाच्या प्रत्येक ठिकाणी ब्लॉक करुन आरोपी तरुणाशी बोलणे बंद केले. त्यामुळे त्याने चिडुन पिडीताच्या नावाने बनावट इंन्स्टाग्राम आयडी तयार करुन त्यामार्फत पिडीतेला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे देखील त्यास रिस्पॉन्स न मिळाल्याने आरोपीतांने पिडीताचे काढलेले आक्षेपार्ह फोटो व व्हीडीओ बनावाट इन्स्टाग्राम आयडीवरुन व्हायरल केले. तसेच पिडीतेच्या नातेवाइकांना व मित्रांना पाठविले.

ब्लॅकमेल करीत खंडणीची मागणी, पीडितेचे आत्महत्येचे प्रयत्न – या प्रकाराबाबत पिडीतेने प्रथम आरोपी तरुणावरच संशय व्यक्त केला. परंतु आरोपी तरुणाने आत्मविश्वासाने सांगितले की, मी सदरची बनावट इन्स्टाग्राम आयडी बनवलेली नाही. परंतु त्याचा शोध घेवुन तुला कळवितो असे सांगितले. परंतु पिडीता व तिच्या नातेवाईकास अनोळखी नंबर वरुन कॉल आला. बनावट इंन्स्टाग्राम आयडी बंद करावयाची असल्यास मला 6 हजार रुपये दयावे लागतील नाहीतर मी हे सर्व फोटो व व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन टाकेल व ही गोष्ट इतर कोणास सांगितली तर विचार कर मी टायगर ग्रुपचा सदस्य आहे. मला धुळे जिल्हयातील सर्व लोक घाबरतात, अशी धमकी दिली. ब्लॅकमेलींगमुळे पीडिता डिप्रेशनमध्ये गेली. त्यातूनच तिने आत्महत्येचे अनेक प्रयत्न देखील केले. पिडीतेने कंटाळुन घराच्याच्या मदतीने धुळे सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.

पिडीतेसह पालकांचे समुपदेशन– तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर पोलिसांनी पिडीत मुलीला व तिच्या पालकांना बोलावून त्याचे समुपदेशन केले. तसेच कुणालाही न घाबरता फिर्याद देण्यास सांगितले. तर सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना तक्रारीबाबत संपुर्ण कल्पना दिली. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करण्यास सांगितले.

इन्स्टा आयडीसाठी भावाचा मोबाईल क्रमांक, वडिलांचा ई-मेल – तपास पथकाने इन्स्टाग्राम आयडीवरुन वापरकर्त्याचे मोबाईल, इंटरनेट व ई मेल आयडीचा शोध घेतले असता आरोपी तरुणाने त्याच्या भावाचा मोबाईल नंबर व वडीलांचा ई-मेलचा वापर करुन 2 बनावट इन्स्टाग्राम आयडीच्या माध्यमातुन पिडीतेच्या फोटो व व्हीडीओ प्रसारीत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुषंगाने सायबर पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या उमराणे (जि. नाशिक) गावातुन ताब्यात घेतले.


गुन्हा दाखल, पोलीस कोठडीत रवानगी- संशयित आरोपी तरुणाविरोधात धुळे सायबर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. 64ए 356(2), 308(2), 351(4), आय.टी. अॅक्ट 66 (सी), (ई), 67 सह पोक्सो अॅक्ट 4 प्रमाणे दाखल करण्यात आला. तसेच त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.30 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आली आहे.

हॉटेल चालकाला केले सहआरोपी- विशेष म्हणजे पीडित मुलगी ही अल्पवयीन असतांना तिचे आयकार्ड चेक न करता ज्या ओये होटलने अनेक वेळा त्यांना रूम दिल्या. जास्त पैसे घेवुन ओये होटलने मुलीचे आयकार्ड मागितले नव्हते. त्यामुळे त्या हॉटेल चालकास देखील प्रथमच गुन्ह्यात सहकार्य केल्याबद्दल आरोपी करण्यात आले आहे. यामुळे अशा कृत्यास सहकार्य करणाऱ्या सर्व प्रकारच्या हॉटल चालकांना पोलिसांकडून स्पष्ट इशारा दिला गेला आहे.

या तपास पथकाची कारवाई– ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याची निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोसई प्रतिक कोळी, जगदीश खैरनार, असई संजय पाटील, पोहेकॉ महेश मराठे, राजेंद्र मोरे, भुषण खलानेकर, हेमंत बागले, तुषार पोतदार, प्रसाद वाघ, महेद्र जाधव, शितल लोहार, प्रियंका देवरे, मृणालीनी भावसार यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक सुरेशकुमार घुसर हे करीत आहेत

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या