Thursday, March 13, 2025
Homeधुळेएसपींनी 'चाय पे' चर्चेसह अंमलदारांच्या उत्कृष्ट कार्याचा केला गौरव

एसपींनी ‘चाय पे’ चर्चेसह अंमलदारांच्या उत्कृष्ट कार्याचा केला गौरव

टॉप कॉप ऑफ द मंथ योजना केली सुरू; या महिन्यात 18 जणांची निवड

धुळे । प्रतिनिधी– जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी उत्कृष्ठ काम करणार्‍या पोलिस अंमलदारांना विशेष सन्मान प्रदान केला आहे. दर महिन्याला प्रत्येक पोलिस ठाण्यातून उत्कृष्ठ काम करणार्‍या कर्मचार्‍यांची निवड करून त्याचा सन्मान करण्यासाठी विशेष योजना सुरू केली आहे. त्यानुसार या महिन्यात 18 अंमलदारांची निवड करीत एसपींनी आज त्यांच्यासोबत चायपे चर्चा केली. त्यांच्या कामाचे कौतूक करीत त्यांचा सन्मानपत्र देवून गौरव केला. दरम्यान या उपक्रमाचे पोलिस कर्मचार्‍यांनी स्वागत केले आहे.

जिल्हा पोलिस दलात अनेक कर्मचारी उल्लेखनीय असे काम करीत असतात पंरतू बर्‍याच वेळा त्याचे हे काम दुर्लक्षीतच राहते. त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. ही बाब लक्षात घेत पोलिसांच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी टॉप कॉप ऑफ द मंथ ही एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश पोलिस अंमलदारांच्या चांगल्या कार्याचा गौरव आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.

- Advertisement -

या योजनेनुसार, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला संबंधित पोलिस ठाण्यात चांगले, उत्कृष्ट कार्य करणार्‍या अंमलदारांची नावे त्या-त्या पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे आपल्या विभागाच्या पोलिस उपअधीक्षक (एसडीपीओ) यांना कळवतील. त्यावरून पोलीस उपअधिक्षक हे कामाची चाचपणी करीत प्रत्येक पोलिस ठाण्यातून एका उत्कृष्ट पोलिस अंमलदाराची निवड करीत त्याला सन्मानपत्र प्रदान करतील. त्यानंतर, त्या महिन्याच्या 10 तारखेला उत्कृष्ट पोलिस अंमलदारांना जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या सोबत चहाला आमंत्रित करतील. या भेटीमध्ये, त्यांच्या कार्याची आणि योगदानाची चर्चा होईल, तसेच त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जाईल. याबरोबरच या योजनेतंर्गत, त्या पोलिसाच्या कामाची माहिती आणि कार्य प्रदर्शन पोलिस दलाच्या नव्या वेबसाइटवर अपलोड केली जाईल, म्हणजे त्यांचे कार्य अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना सार्वजनिक मान्यता मिळेल. या योजनेच्या माध्यमातून पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे उत्साहवर्धन होईल आणि पोलिस सेवा करतांना नवीन प्रोत्साहन मिळेल.

दरम्यान या फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक अशा एकुण 18 उत्कृष्ठ कार्य करणार्‍या पोलिस अंमलदारांची निवड करण्यात आली. या सर्वांसोबत आज पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्यांच्या कार्यालयात चाय पे चर्चा करीत त्यांच्या कामाचे कौतूक केले. कार्यक्रमानंतर या अंमलदारांनी मान गये साहब, एसपी असावे तर असे… असे म्हणत पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपक्रमाचे कौतूक केले. या सन्मानामुळे आमच्या कामाचा उत्साह द्विगुणीत झाल्याची प्रतिक्रिया या पोलिस अंमलदारांनी दिली.

या अंमलदारांची उत्कृष्ठ कामगिरी
या महिन्यात पोकाँ रविकिरण राठोड (धुळे शहर), पोहेकाँ नितीन पाटील (आझादनगर), पोकाँ स्वप्निल सोनवणे (चाळीसगाव रोड), पोकाँ मधुकर पाटील (देवपूर), चालक पोहेकाँ किरण भदाणे (प.देवपूर), पोकाँ मनिष सोनगीरे (मोहाडी), महिला पोकाँ राणी दामोदर (शहर वाहतूक शाखा), पोकाँ सोमा ठाकरे (शिरपूर शहर), पोहेकाँ सागर ठाकूर (शिरपूर तालुका), पोकाँ योगेश पारधी (थाळनेर), पोकाँ सौरभ बागुल (दोंडाईचा), पोकाँ प्रशांत पवार (शिंदखेडा), पोकाँ गजेंद्र पावरा (नरडाणा), पोहवा प्रशांत ठाकुर (निजामपूर), पोलिस शिपाई संदिप पावरा (पिंपळनेर), पोहेकाँ शांतीलाल पाटील (साक्री), पोकाँ दीपक मोहीते (धुळे तालुका), पोकाँ रोहन वाघ (सोनगीर) यांना उत्कृष्ठ कामगिरीबद्दल सन्मानपत्र देण्यात आले.

प्रत्येक महिन्यात घेणार कामगिरीची दखल-
जिल्हा पोलीस दलात अनेक कर्मचारी चांगली कामगिरी करतात. त्यांच्या उत्कृष्ठ कामाची दर महिन्याला नोंद घेतली जाणार असून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. या महिन्यात 18 अंमलदारांचा सन्मान करण्यात आला.
-श्रीकांत धिवरे,
जिल्हा पोलिस अधिक्षक, धुळे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...