Tuesday, March 25, 2025
Homeधुळेकापूस उत्पादक शेतकर्‍यांना लुटणारे दोघे रोकडसह जेरबंद

कापूस उत्पादक शेतकर्‍यांना लुटणारे दोघे रोकडसह जेरबंद

मोहाडी पोलिसांची कामगिरी ;महिनाभरापासून देत होते गुंगारा

धुळे | प्रतिनिधी– मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्याच्या पुढे रानमळा फाट्याजवळ कापुस उत्पादक शेतकर्‍यांना लुटणार्‍या टोळीतील दोघांना मोहाडी पोलिसांनी शिताफिने जेरबंद केले. हे दोघे महिनाभरापासून गुंगारा देत होते. त्यांच्याकडून लुटीतील रक्कमेपैकी ७ लाख ४८ हजार १८५ रूपये हस्तगत करण्यात आले आहेत. मोहाडी पोलिसांच्या या प्रभावी कामगिरीचे पोलिस अधिक्षकांनी विशेष कौतूक केले.

धुळे तालुक्यातील आर्वी येथे राहणारे दिलीप महादु गर्दे हे  त्यांचे सहकारी संतोष मोतीराम मासुळे (रा. सडगांव ता. धुळे) हे  दोघे त्यांचे कापुस विक्रीचे १३ लाख १५ हजार २०० रुपये घेवुन दुचाकीने धुळ्याकडुन आर्वीकडे जात होते.  त्यादरम्यान लळींग टोलनाक्याच्या पुढे रानमळा फाट्याजवळ एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर तोंडाला मास्क बांधुन आलेल्या अज्ञात तिघांनी त्यांना अडविले. एकाने संतोष मासुळे यांच्या उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करीत त्यांच्या जवळील वरील  रोकड असलेली बॅग हिसकावून पळुन गेले. दि.९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत दिलीप गर्दे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोहाडीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

आरोपी केले निष्पन्न, एकास अटक – गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखा व मोहाडी पोलिसांनी गुन्हयाचा समांतर तपास करुन आरोपी निष्पन्न केले. त्यात रितिक ऊर्फ निक्की अमरिकसिंग पंजाबी,  (वय२२  रा. कोळवले नगर, धुळे), खुशाल ऊर्फ मनोज अशोक मोकळ  (रा.म्हाडा वसाहत, मोहाडी उपनगर, धुळे), बंटी शांताराम आहिरे व रवींद्र राजेंद्र वाघ (रा. मोहाडी उपनगर, धुळे) यांचा समावेश असून त्यातील रितिक ऊर्फ निक्की पंजाबी, यास दि.१३ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. परंतु तिघे आरोपी गुन्हा फरार होते.

प्रकरणात स्वतः एसपींनी घातले लक्ष- आरोपीतांनी लुटलेली रोख रक्कम ही सर्वसामान्य शेतकर्‍यांची असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालुन मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांना गुन्हयातील फरार आरोपींचा लवकरात लवकर शोध घेत चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

आरोपी देत होत गुंगारा-  पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी एक विशेष पथकाची नेमणुक केली. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करुन आरोपींचा सुरत, गुजरात तसेच पारवाडी  (ता.बारामती, जि. पुणे), अंगापुर वंदन (ता. जि. सातारा) येथे जावुन शोध घेतला. परंतु प्रत्येकवेळी गुन्हयातील फरार आरोपी हे पोलिसांना गुंगारा देवुन पळ काढत होते.

आणि सापळा लावून केले जेरबंद- आज दि.१३ रोजी फरार आरोपी बंटी शांताराम अहिरे व रवींद्र राजेंद्र वाघ हे दोघे धुळे येथे येणार असल्याची खात्रिशीर माहिती निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळाली. त्यांच्या आदेशावरुन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे व शोध पथकातील अंमलदार यांनी सावळदे शिवारात रेल्वे लाईनच्या जवळ सापळा रचुन दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील ७ लाख ४८ हजार १८५ रुपयांची रोकडे  हस्तगत करण्यात आली. पुढील तपास पोसई संदीप काळे हे करीत आहेत.

या पथकाची कामगिरी- ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, चेतन मुंढे, नितीन करंडे, पोहवा संदीप कदम, किरण कोठावदे, सचिन वाघ, पंकज चव्हाण, पोकॉं मनिष सोनगिरे, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, बापुजी पाटील, चालक पोहवा शशिकांत वारके यांच्या पथकाने केली.

निष्काळजी नकोच- एसपी
नागरिकांनी अशा निष्काळजीपणे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगु नये. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्या आर्थिक हालचाली आणि प्रवासाबाबत माहिती इतरांना सांगू नये. कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावे. आपल्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे, असे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...