धुळे । (प्रतिनिधी) : विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 84 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे वडील होते. माजीमंत्री रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवासस्थानापासून काढण्यात येणार असून एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे अंत्यदर्शन शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटीतील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल.
- Advertisment -