Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedजळगावच्या आरोपीचे असहकार्य, स्वतःवरच केले वार

जळगावच्या आरोपीचे असहकार्य, स्वतःवरच केले वार

धुळे । येथील आझादनगर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेला जळगावातील एक आरोपी पोलिसांना तपासात असहकार्य करीत आहे. तपासाची दिशा भरकटविण्याच्या उद्देशाने त्याने चिनी प्लेटच्या तुकड्याने स्वतःवर वार करीत जखमी करून घेतले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझादनगर पोलिसांनी एका गुन्ह्यात राम उर्फ सोनु भगवान सारवान (वय 29 रा. शनिपेठ, जळगाव) यास अटक केली आहे. त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले असून त्याने गुन्हे तपासात सहकार्य न करण्यासाठी तसेच तपासाची दिशा भरकटविण्याच्या उद्देशाने काल दि. 24 रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोकाँ पंकज जोंधळे यांना पाणी आणण्यासाठी पाठविली. त्याचा फायदा घेवुन त्याने लॉकअपमधील बाथरूममध्ये जावून एका चिनी मातीच्या प्लेटच्या तुकड्याने स्वतःच्या दोन्ही हातावर, दंडावर व गळ्यावर वार करीत दुखापत करून घेतली. याबाबत पोकाँ पंकज जोंधळे यांच्या फिर्यादीवरून सोनु सारवान याच्याविरोधात भादंवि कलम 337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पीएसआय सैय्यद पुढील तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...