Wednesday, December 4, 2024
Homeनंदुरबारजि.प.अध्यक्षांवरील अविश्‍वास प्रस्ताव बारगळला, प्रस्ताव सादर करणार्‍यांनीदेखील अविश्‍वासाच्या बाजूने मतदान केले नाही

जि.प.अध्यक्षांवरील अविश्‍वास प्रस्ताव बारगळला, प्रस्ताव सादर करणार्‍यांनीदेखील अविश्‍वासाच्या बाजूने मतदान केले नाही

नंदुरबार | दि.३१| प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्‍वास प्रस्ताव बारगळला आहे. विशेष म्हणजे ज्या २० सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला त्यांनीदेखील प्रस्तावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले नाही. विरोधी गटातील सर्व २३ सदस्य तटस्थ होते तर पाच जि.प.सदस्य अनुपस्थित होते.

- Advertisement -

गेल्या महिन्याभरापासून जिल्हा परिषद अध्यक्षांवर अविश्‍वास प्रस्ताव आणला जाईल, अशा चर्चा होत्या. मात्र, या चर्चा खर्‍या ठरुन सत्ताधारी गटातीलच २० जि.प. सदस्यांनी जि.प.अध्यक्षांवर अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तसेच पुढील कार्यवाहीसाठी आज दि.३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी गोविंद दाणेज होते. यावेळी ५६ पैकी ५१ जि.प.सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला अविश्‍वास प्रस्ताव सभेपुढे सादर करण्यात आला. त्यावर श्री.दाणेज यांनी या अविश्‍वास प्रस्तावाच्या बाजुने कोणाला मतदान करायचे असेल त्यांनी हात उंचावून मत मांडण्याचे आवाहन केले.

मात्र, अविश्‍वास ठरावाच्या बाजूने कोणीही मतदान केले नाही. विशेष म्हणजे ज्या २० सदस्यांनी हा अविश्‍वास प्रस्ताव सादर केला होता त्यांनीदेखील या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले नाही. त्यामुळे हा अविश्‍वास प्रस्ताव बारगळला. विरोधी पक्षातील २३ सदस्य अविश्‍वास ठरावाबाबत तटस्थ होते.

तर जि.प.सदस्य भरत गावित, महिला व बालकल्याण सभापती सौ.संगिता भरत गावित, ऐश्‍वर्यादेवी रावल, कृषि सभापती गणेश पराडके, विरोधी पक्षनेता रतन पाडवी हे पाच सदस्य गैरहजर होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या