Sunday, September 15, 2024
Homeजळगावजी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलला सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलला सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार

जळगाव- पुणे येथील एथोस एज्यु सोल्युशन्स च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या प्रिन्सिपल कॉन्क्लेव्ह येथे जळगाव शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलला मोस्ट टेक्निकल कंपेटेंट टीचर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा व प्रशांत महाशब्दे यांनी हा पुरस्कार शैक्षणिक परिषदेतील मुख्य अतिथी व एथोस एज्युसोल्युशन्स संस्थेचे संचालक मंडळाच्या हस्ते स्वीकारला.
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत करण्याचे काम जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल करीत असून पुणे येथील एथोस एज्यु सोल्युशन्सकडून झालेल्या मूल्यांकनामुळे या कामावर मान्यतेची मोहोर उमटली आहे, विद्यार्थी, शिक्षक, पालक व संस्थेचे विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्यामुळेच हे यश मिळणे शक्य झाले. तसेच आमचे मार्गदर्शक व जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे व्हिजन व स्कूलमधील शिक्षक तसेच इतर सहकार्‍यांच्या सहकार्यामुळेच मोस्ट टेक्निकल कंपेटेंट टीचर्स या एक्सलन्स पातळीला गाठू शकले. येत्या काळात पालकांच्या ज्या स्कूलकडून अपेक्षा आहेत त्या निश्चितच आम्ही पूर्ण करू. दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडणार नाही तसेच नवनवीन टेक्निकल विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील राहणार असून विध्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण आम्ही देत राहणार असे म्हटले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल व पलक रायसोनी यांनी देखील स्कूल कमिटीचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या