Thursday, January 16, 2025
Homeक्राईमडिलरशीप देण्याच्या बहाण्याने दोंडाईचातील एकास १० लाखात गंडा

डिलरशीप देण्याच्या बहाण्याने दोंडाईचातील एकास १० लाखात गंडा

कंपनीच्या पुणे, सुरत येथील चौघांवर गुन्हा

धुळे | प्रतिनिधी- इलेक्ट्रीक दुचाकींची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने दोंडाईचातील एकास चौघांनी तब्बल १० लाखात गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अजय कृष्णा सानप (वय ४८ रा. रश्मीजी नगर, यावल नगर, चुडाणे रोड, दोंडाईचा) यांनी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पुणे येथील कायनेटीक ग्रीन एनर्जी ऍण्ड पावर सोल्युशन लि.च्या संचालक सुजाला फिरादीया मोटवानी, रिलेशनशिप ऑफिसर अविनाश पांडे (रा. कायनेटीक इनोव्होशन पार्क डी १, प्लॉट नं. २/१८ एमआयडीसी चिंचवड, पुणे), अकाऊंट मॅनेजर रब्बीकुमार (रा. हिरा नगर, बामरोली रोड,पांडेसरा, सुरत) व शाखा व्यवस्थापक इंद्रजीतकुमार विजेंद्रप्रसाद (रा. ३३०, गणेश नगर, सुरत) यांनी त्यांच्या कंपनीच्या संकेतस्थळावर जिल्हास्तरावर डिलरशीप नेमणुकीसाठी जाहिरात दिली होती. त्यावरून त्यांनी फिर्यादी सानप यास दोंडाईचा येथे कायनेटीक इलेक्ट्रीक वाहनांचे डिलरशीप देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून युपीआयव्दारे एकुण १० लाख ४६ हजार ७९३ रूपये घेत त्यांची फसवणूक केली. दि. ४ एप्रिल ते ३ मे २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय चांददेव हंडाळ हे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या