Thursday, March 13, 2025
Homeधुळेतरुणाच्या सतर्कतेमुळे एसटीमधील ४ लाखांची चोरी उघड

तरुणाच्या सतर्कतेमुळे एसटीमधील ४ लाखांची चोरी उघड

चिखलठाण्यातील दोघा महिलांना अटक; रोकड जप्त

धुळे | प्रतिनिधी- एसटी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघड झाली असून, दोन सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे. या महिलांकडून प्रवाशाच्या बॅगेतून चोरलेली ४ लाख ९ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

शिवाजी राजाराम पाटील (वय ७०, रा.दाऊळ मंदाणे, ता.शिंदखेडा) हे आज दि.१४ रोजी सकाळी साडेदहा वाजता दोंडाईचा येथून धुळे येथे येण्यासाठी एमएच १४ बीटी १८६४ क्रमांकाच्या नंदुरबार-धुळे बसमध्ये बसले. प्रवास करत असताना सोनगीर येथून दोन महिला बसमध्ये चढल्या. त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली. तिने नगाव चौफुली (देवपूर, धुळे) येथे पाटील यांच्या बॅगेची चैन उघडून त्यातील ४ लाख ९ हजार ५०० रुपये काढून दुसर्‍या महिलेने दिलेल्या बॅगेत ठेवले. मात्र, हीबाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील (रा. रेल्वे स्टेशन, धुळे) याच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केली. तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचार्‍यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली.
पदमा राहुल शेट्टी (वय २०, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) व अक्षया राजन शेट्टी (वय २०, रा. चिखलठाणा, औरंगाबाद) अशी दोघा महिला चोरट्यांची नावे असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

- Advertisement -


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.उपासे तसेच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश आघाव, शोध पथकातील असई मिलिंद सोनवणे, पोकॉ प्रविण पाटील, भटेंद्र पाटील, राहुल गुंजाळ, वसंत कोकणी, सौरभ कुटे, नितीन चव्हाण, महिला पोहेकॉं शिरसाठ आणि महिला पोकॉ धोबी यांनी केली.
या घटनेमुळे बस प्रवासादरम्यान प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यक आहे.

एसपींनी केला मोहितचा सन्मान-
मोहित पाटील हा तरूण इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत असून त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघडकीस आली आणि वयोवृद्ध व्यक्तीचे मोठे नुकसान टळले. पोलिसांनी मोहितच्या सतर्कतेचे कौतुक केले. तसेच पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोहित याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...