Saturday, July 27, 2024
Homeनगरतिसरी लाट थोपविण्यासाठी विखे पाटील फाऊंडेशनकडून नगरमध्ये जनजागृती

तिसरी लाट थोपविण्यासाठी विखे पाटील फाऊंडेशनकडून नगरमध्ये जनजागृती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तिसरी लाट थोपविण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील सिग्नलवर विखे पाटील मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी मास्क न वापरणार्‍या नागरिकांना मास्क देऊन करोनाचे संक्रमण थांबविण्याची विनंती केली. महाविद्यालयात शिकत असलेल्या भावी डॉक्टरांनी रस्त्यावर उतरुन करोना प्रतिबंधात्मकतेसाठी उपाययोजनांची माहिती देऊन, वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्याबद्दल मार्गदर्शन केले.

- Advertisement -

डिएसपी चौक येथील सिग्नलवर करोना प्रतिबंधात्मक जनजागृती अभियानाचे प्रारंभ शहराचे विभागीय पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक राजेंद्र भोसले, भिंगार कॅम्पचे सहायक निरिक्षक शशीकुमार देशमुख, विखे पाटील कॉलेजचे डॉ. जहीर मुजावर आदींसह कॉलेजचे विद्यार्थी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी विखे पाटील मेडिकल फाऊंडेशनचे संचालक खा. डॉ. सुजय विखे पाटील, उपसंचालक अभिजीत दिवटे, कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलचे डीन सुनिल म्हस्के, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या