Tuesday, July 23, 2024
Homeजळगावदीडशे कंत्राटदारांचे शासनाकडे ८५० कोटी रुपये थकीत

दीडशे कंत्राटदारांचे शासनाकडे ८५० कोटी रुपये थकीत

बांधकाम विभागात संघटनेचे लाक्षणिक उपोषण ; शासनाचा निषेध

- Advertisement -

जळगाव – शासनाची काम करताना शासनाकडून तुटपुंजा स्वरूपाचा निधी दिला जातो. त्यामुळे काम करताना कंत्राटदाराना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून १००% निधी मिळावा या मागणीसाठी आज जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील कंत्राटदारांच्यावतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजीनियर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
जिल्ह्यात एकूण १५० कंत्राटदार असून त्यांच्यावतीने केलेल्या कामाचे तब्बल साडेआठशे कोटी रुपयांची बिलही शासनाकडे थकीत आहे. दरवेळी बिलांसाठी निधी मिळावा यासाठी आंदोलने केली जातात त्यानंतरच थोडाफार निधी मिळतो. त्यामुळे काम पूर्ण करताना ठेकेदारांना मोठे अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक ठेकेदारांनी बँकेकडून कर्ज घेतले असून आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे अधिवेशनामध्ये कंत्राटदारांना शंभर टक्के निधी देण्यात बाबत ठराव केला जावा.वेळेत निधी मिळाला नाही तर आगामी काळात सुरू असलेली शासनाची सर्व कामे बंद केली जातील असा इशारा लाक्षणिक उपोषण वतीने देण्यात आला आहे.
यांचा होता सहभाग
या आंदोलनात प्रमोद नेमाड़े, विकास महाजन,संजय पाटील, मिलिंद अग्रवाल, विनय बढ़े, प्रदीप पाटील, योगेश पाटील, उज्ज्वल बोरसे,सुशील डोंगरे,शेखर तायडे, श्रीराम चौधरी, अमोल महाजन, शरद पाटील, एल. एच. पाटील, आशिष कासट, सुनील पाटील, तुषार महाजन, अमोल कासट, सुधाकर कोळी, हर्षल सोनवणे, प्रतीक पाटील, किशोर पाटील, अजय पाटील, एम. एस. जैन, शशिकांत पाटील, राहुल तिवारी, चंद्रशेखर पाटील, विनोद पाटील, सिद्धार्थ दाधीच, नितीन सपकाळे, मनीष चव्हाण, निलेश पाटील, चेतन कापडणे, ज्ञानेश्वर पाटील, विलास पाटील, संदीप भोरटक्के, सचिन पाटील, पंकज वाघ, राजीव मणियार, उमेश शहा, शितल सोमवंशी, चंद्रकांत कोळी, सपनेश बाहेती, आदित्य माळी, अमोल महाजन, ललित पाटील, अतुल पाटील, नरेंद्र अग्रवाल, भूषण पाटील, निकेत कुमावत, अथर्व मराठे, संदीप यादव, नरेंद्र पाटील,स्वप्निल शेंडे, गणेश बोरसे आदि सहभागी झाले

- Advertisment -

ताज्या बातम्या