Friday, September 20, 2024
Homeधुळेदेवपूरातील बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

देवपूरातील बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

8 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळे । प्रतिनिधी : शहरातील देवपूर परिसरातील न्यू सुयोग कॉलनीतील एका घरातील पहिल्या मजल्यावरील बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकत उद्ध्वस्त केला. या कारवाईत एकूण 8 लाख 59 हजार 470 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

देवपूरातील न्यू सुयोग कॉलनीतील प्लॉट न 10 मधील घराच्या पहिल्या मजल्यावर बनावट देशी दारूची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तेथे छापा टाकला. या ठिकाणी बनावट देशी दारू व दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य मिळून आले. बनावट देशी दारू रॉकेट संत्राचे 90 मिलीच्या सीलबंद बाटल्या, बनावट देशी दारू बनविण्यासाठी लागणारे स्पिरीट, इसेन्स, देशी दारू रॉकेट संत्राचे बनावट 30 हजार पत्री बुच, बनावट देशी दारू रॉकेट संत्राचे 6,25,000 लेबल, मद्य बाटलीस पत्री बुच सिलबंद करण्याचे एक कॅपिंग मशीन, एकूण 12 प्लास्टिक ट्रे, हायड्रोमीटर थर्मामीटर, एकूण 16 बॉक्स डिंक सिलिंग टेप, एक मोबाईल असा एकूण 8 लाख 59 हजार 470 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरिक्षक डी. एल. दिंडकर, आर. आर. धनवटे, दुय्यम निरीक्षक एस.एस.शिंदे., एस.एस.आवटे, पी. बी. अहिरराव, बी. एस. चोथवे, जितेंद्र फुलपगारे, जवान के. एम. गोसावी, गोरख पाटील, दारासिंग पावरा, वाहन चालक विजय नाहीदे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या