Wednesday, February 19, 2025
Homeधुळेधुळे जिल्हा पोलीस दलातर्फे एकाच दिवसात १६७ अर्जदारांचे समाधान

धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे एकाच दिवसात १६७ अर्जदारांचे समाधान

धुळे : प्रतिनिधी- जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिनानिमित्त एकाच दिवसात १६७ अर्जदारांचे समाधान करण्यात आले. तक्रार निवारण दिनाची कार्यपध्दती अशीच सुरु ठेवण्यात येणार असून सर्व नागरीकांनी या कार्यपध्दतीनुसार आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत दृक परिषदव्दारे झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी ७ कलमी कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्या अंतर्गत धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार आठवडयाचे प्रत्येक शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजे दरम्यान जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत असतो. या दिवशी अपर पोलीस अधीक्षक तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या व्दारे पोलीस अधीक्षकांनी ठरवुन दिलेल्या ठिकाणी तक्रार निवारण दिन आयोजित करुन नागरीकांचे तक्रारीचे निवारण होणार आहे. त्यानुसार आज दि. १८ रोजी सकाळी प्रत्येक पोलीस ठाणे व उपविभाग निहाय १६७ तक्रारी अर्ज निकाली काढून संबंधीत तक्रारी अर्जदारांचे समाधान करण्यात आले.

- Advertisement -

पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करुन जास्तीत जास्त तक्रारी अर्जदारांचे तक्रारींचे निवारण करुन तक्रारी अर्जाची निर्गती करणे, प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख बनविणे, जनतेच्या तक्रारीची दखल घेणे, तक्रारीचे वेळेत निरसण करणे, तक्रारदारांना सन्मानाची वागणूक देणे, खोटया व दिशाभुल करणाऱ्या अनेक तक्रारींची शहानिशा करणे, भविष्यात गुन्हयांना प्रतिबंध करणे, तक्रांरीची वेळीच निरसण करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे या स्वरुपाचे उद्देश साध्य होण्यासाठी तक्रार निवारण दिन म्हणुन आठवडयाच्या प्रत्येक शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या