Friday, April 25, 2025
Homeधुळेधुळे जिल्हा रुग्णालयास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त

धुळे जिल्हा रुग्णालयास राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त

अतिदक्षता विभागाच्या उत्कृष्ट कार्याची दखल

धुळे : जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने मुंबई येथील श्री. यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, व राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालय, धुळे येथील अतिदक्षता विभागास (आयसीयू) उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वितरीत करण्यात आला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.दत्ता देगांवकर यांनी दिली आहे.

जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने 7 एप्रिल रोजी श्री. यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य विभागातील उत्तम कामगिरी करणारे जिल्हे, जास्त प्रसूती करणारी संस्था, उत्तम कामगिरी करणारे आयसीयू यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात जिल्हा रुग्णालय, धुळे येथील अतिदक्षता विभागास (आयसीयू) उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार धुळे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दत्ता देगांवकर, अतिदक्षता विभाग प्रमूख डॉ. रवि सोनवणे, भुलतज्ञ वर्ग-1 डॉ. अश्विनी भामरे, भिषक डॉ. विकास बोरसे, परिसेविका दिपाली मोरे, अधिपरिचारीका मिनाक्षी परदेशी, कक्षसेवक कमलाकर गायकवाड यांना विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय मंत्री प्रकाश आबिटकर, विधान परिषद सदस्य डॉ.मनिषा कायदे, आरोग्य विभागातील सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

रुग्णालयीन सेवांचा दर्जा वाढविण्याबाबत धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचे सदैव मार्गदर्शन लाभत असते, असे मनोगत धुळे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी व्यक्त केले.
हा पुरस्कार मिळविण्यात धुळे जिल्हा व स्त्री रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक, वैद्यकीय अधिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं), सर्व विषयातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका, अधिपरिचारीका व वर्ग-4 कर्मचारी यांचे योगदान लाभल्याचे जिल्हा
शल्यचिकीत्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...