Sunday, November 3, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात १३ उमेदवारांचे अर्ज अवैध; माघारीअंती चित्र...

धुळे जिल्ह्यात १३ उमेदवारांचे अर्ज अवैध; माघारीअंती चित्र होणार स्पष्ट

धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ११५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज छाननीच्यावेळी ११५ पैकी १३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून १०२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे. दरम्यान अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर असून त्यानंतरच जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होणार आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदार संघात एकूण ३३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यापैकी वसंत दोधा सुर्यवंशी, मीनाक्षी प्रविण चौरे, भुर्‍या यादव मोरे या ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. तर ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

- Advertisement -

धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यापैकी बाजीराव हिरामण  पाटील, यशवंत दामू खैरणार, गुलाबराव धोंडू कोतेकर या ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. तर १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

धुळे शहर विधानसभा मतदार संघात एकूण २५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यापैकी मोहम्मद मेहमुदुल हसन जफर अब्बास अन्सारी, अशोक शंकर पाटील, भारती मनोज मोरे, ङ धीरज प्रकाश चोरडिया, केकाण राजेंद्र माधव या ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. तर २० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

शिंदखेडा विधानसभा मतदार संघात एकूण २६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यापैकी  वैभव दिगंबर निकम, भोजेसिंग तोडरसिंग रावल या २ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहे. तर २४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
शिरपूर विधानसभा मतदार संघात एकूण १३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या