Monday, October 14, 2024
Homeजळगावपेटंट फाईल करण्यात भारत पिछाडीवर

पेटंट फाईल करण्यात भारत पिछाडीवर

आयराईज क्षमता निर्माण कार्यशाळेप्रसंगी प्र-कुलगुरू इंगळे यांची माहिती

जळगाव २५, (प्रतिनिधी) : पेटंट फाईल करण्यात भारत पिछाडीवर असून संशोधकांनी संशोधनासोबत पेटंट फाईल करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी केले.
संशोधक विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक रोजगार क्षमता कौशल्यासह सुसज्ज करून त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक क्षमता वाढीला लागावी या दृष्टीकोनातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बौध्दीक संपदा हक्क कक्षाच्या वतीने आयोजित आयराईज क्षमता निर्माण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रा. इंगळे बोलत होते. यावेळी मंचावर आयसीटी, मुंबई येथील ऍडजंक्ट प्रोफेसर दिलीप उदास, बौध्दीक संपदा हक्क कक्षाचे चेअर प्रोफेसर प्रा.डी.जी. हुंडीवाले, आयराईजच्या व्यवस्थापक प्रिती निमा, समन्वयक वैष्णवी कुलकर्णी, प्रा. व्ही.व्ही. गिते, प्रा. भुषण चौधरी, केसीआयआयएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील उपस्थित होते. आयसर पुणे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा झाली. यामध्ये १२० संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. प्रा. इंगळे म्हणाले की, स्टार्टअप इंडिया, डिजीटल इंडिया आणि स्कील इंडिया या उपक्रमासाठी भारत सरकार सातत्याने प्रोत्साहन देत असून निधी देखील देत आहे. त्यामुळे देशाचे चित्र हळुहळू बदलू लागले आहे. बौध्दीक संपदा हक्का विषयी जनजागृती नाही. या कार्यशाळेमुळे ही जागृती वाढेल अशी आशा असून विद्यापीठाने कुलगुरू पेटंट प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत सामंजस्य करार केला आहे. याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल असे प्रा. इंगळे म्हणाले.यावेळी सहभागी शिवराज ढोले, जयश्री बोथरा आणि अतुल पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. व्ही.व्ही. गिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर पाटील या विद्यार्थ्याने केले तर केतन मालखेडे याने आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या