Tuesday, December 10, 2024
Homeक्राईमफागणे ग्रा.पं.ची लाचखोर चौकडी रंगेहात

फागणे ग्रा.पं.ची लाचखोर चौकडी रंगेहात

धुळे एसीबीची धडाकेबाज कारवाई

धुळे | प्रतिनिधी– येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज धडाकेबाज कारवाई केली.  धुळे तालुक्यातील फागणे ग्रामपंचायतीतील लाचखोर चौकडीला ४ हजारांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या चौकडीमध्ये फागणेचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील, सरपंच पती नगराज हिलाल पाटील, लिपीक किरण शाम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांचा समावेश आहे. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या घराचे अतिक्रमण नियमाकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होवुन अद्यावत नमुना नं.८ घराचा उतारा मिळण्याकरीता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील व सरपंचपती नगराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय, फागणे येथे जावुन भेट घेतली. तेव्हा त्यांनी तक्रारदाराच्या घराच्या नमुना नं.८ वरील अतिक्रमण नियमाकुल झाल्याची नोंद करून अद्यावत उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार दि.१६ एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता सरपंचपती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील यांना ४ हजार रूपये लाच देण्याकरीता प्रोत्साहन (अपप्रेरणा) दिली. तसेच आज दि. १८. रोजी ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील यांनी तक्रारदाराकडे ४ रुपये लाचेची मागणी करीत लाचेची रक्कम लिपीक किरण पाटील यांचे हस्ते स्विकारल्याने चौघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. चौघांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

- Advertisement -

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या