Tuesday, May 21, 2024
HomeUncategorizedफूड हँगओव्हर टाळतांना

फूड हँगओव्हर टाळतांना

सध्या पार्ट्यांचा काळ आहे. रात्री उशिरांपर्यंत चालणार्‍या पार्ट्यांचा सर्वत्र बोलबाला आहे. अनेकजण पार्ट्यात आवडीने सहभागी होतात. पार्टीत खान-पानला उधाण येते. परंतु या पार्ट्या आपल्या आजाराचे कारण ठरू शकतात. पार्ट्यातील लज्जत आणि चवदार पदार्थ पाहून आपल्या जीभेला पाणी सुटते आणि खाण्याचा मोह आवरत नाही. अनेकदा तर तेलकट, मसालेदार आणि मिठाई आपण गरजेपेक्षा अधिक खातो. पार्टीच्या वेळी यथेच्छ भोजन करताना काही वाटत नाही, मात्र कालांतराने त्याची जाणीव होते.

प्रत्यक्षात शरिर अतिरिक्त जेवण पचवण्यास तयार नसते. त्यामुळे खर्‍या अडचणीला सुरवात होते. या आधारावर लठ्ठपणा वाढत जातो. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खात राहिल्याने शरिर फुगत जाते. अर्थात ही समस्या कायम राहत नाही. बारा किंवा सोळा तासानंतर प्रकृती सामान्य होते.

- Advertisement -

मसालेदार पदार्थापासून दूर राहा :
मसालेदार पदार्थाचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. जर रात्री पार्टीत जायचे असेल तर दिवसभर थोड्या थोड्या अंतराने खात राहा. त्यामुळे आपल्याला पार्टीत अधिक भूख लागणार नाही आणि ओव्हर इंटिगपासून आपला बचाव होईल.

तेलकट खावू नका : मांसाहारी भोजनात तेलाचा अधिक वापर होतो. परिणामी कॅलरी अधिक असल्याने ती बाब प्रकृतीला मारक ठरते. त्यामुळे संतुलीत आहार करावा. वास्तविक मांसाहाराऐवजी शाकाहाराला प्राधान्य द्यावे. जेवणाच्या ताटात सॅलेड आणि भाजीपाला अधिक ठेवावा. मिठाईऐवजी फळ खाण्याबाबत सजग राहवे. जेवणही सावकाश आणि चांगल्या रितीने चावून करावे. काही मंडळी घाईगडबडीत जेवतात आणि नकळतपणे अधिक जेवण केले जाते. प्रत्यक्षात आहार झाल्यानंतर तृप्तिचे संकेत मिळण्यासाठी मेंदूला दहा पंधरा मिनिेटे लागतात.

रात्री उशिरा खाणे टाळा :
डिनर लवकर घेण्याबाबत आग्रही राहा. उशिरा जेवण केल्याने मेटाबोलिझ्मचा वेग कमी होतो. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावे.मध आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण त्यात करु शकता. अँटीऑक्सिडंटमुळे फूड हँगओव्हरचा सामना करणे सोपे जाते. छातीत जळजळ होण्याचे प्रमाण थांबते. तसेच पचनालाही मदत करते. फूड हँगओव्हरपासून बचाव करण्यासाठी लिंबू पाणी हा सर्वात चांगला उपाय मानला जातो. पाणी प्यायलानंतर शरिर फुगल्याचा भास होतो. मात्र कालांतराने दिलासा मिळेल. जेवण झाल्यानंतर शतपावलीची सवय ठेवावी. पाचन तंत्रासाठी अशा प्रकारची हालचाल आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या