Tuesday, December 10, 2024
Homeक्राईमबैलांनी भरलेले वाहन सोडविण्यासाठी खंडणी मागणार्‍या सात जणांविरुद्ध गुन्हा

बैलांनी भरलेले वाहन सोडविण्यासाठी खंडणी मागणार्‍या सात जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी –
बैलांनी भरलेले वाहन थांबवून चालकाकडून ती गाडी सोडविण्यासाठी खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी मनरद ता.शहादा येथील सात जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१० जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास मनरद गावाजवळ शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनोज काशिनाथ कोळी, निलेश मुकेश सावळे, योगेश विठ्ठल कोळी, निलेश दिलीप यशीकर, रविंद्र भगवान माळी (सर्व रा.मनरद ता.शहादा) व इतर दोन जणांनी दि.१० जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास विजय लोटन पाटील (बैलांचे व्यापारी रा. प्लॉट क्र.३९ तुळजाभवानी नगर चोपडा, ता. चोपडा जि.जळगाव) यांच्या मालकीच्या बैलांची जोडी भरलेले वाहन तळोदा येथून प्रकाशा शहादा मार्गे चोपडा येथे जात असतांना मनरद गावाजवळ थांबवले.

- Advertisement -

पाटील यांच्याकडे सदर बैलांची गाडी सोडण्यासाठी पैश्यांची मागणी करुन डांबून ठेवले तसेच धक्काबुक्की करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच वाहन शहादा येथे बेकायदेशिररित्या घेवुन आले. याबाबत विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या