Wednesday, February 19, 2025
Homeधुळेमारहाण करीत पत्नीने केला पतीचा खून

मारहाण करीत पत्नीने केला पतीचा खून

कुरखळीतील खळबळजनक घटना

धुळे (प्रतिनिधी)- शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथे पत्नीने बेदम मारहाण करीत पतीचा खुन केला. काल दुपारी ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पत्नीवर थाळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण काशिनाथ धनगर (वय 43 रा. कुरखळी ता. शिरपूर) असे मयत पतीचे नाव आहे. त्याला नेहमीच दारू पिण्याची सवय होती. त्यामुळे त्याचे पत्नी संगिताबाई हिच्याशी वाद होत होते. काल दि. 16 जुलै रोजी दुचारी चार वाजेच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा संगिताबाई हिने पती श्रावण धनगर यास बेदम मारहाण करीत त्याच खून केला. याबाबत गोकुळ काशिनाथ धनगर यांच्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिस ठाण्यात पत्नी संगिताबाई श्रावण धनगर हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103-1 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात हे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या