Sunday, May 25, 2025
Homeक्राईममुलासाठी केली माशाची भाजी; कुत्र्याने खाल्ल्याने केला आईचा खून

मुलासाठी केली माशाची भाजी; कुत्र्याने खाल्ल्याने केला आईचा खून

धुळे । प्रतिनिधी

- Advertisement -

माशाची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या वृद्ध आईचा लाकडी दांडक्याने मारून खून केल्याची संतापजनक घटना ताजपुरी येथे घडली. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला थाळनेर पोलिसांनी केवळ चार तासांत शेतातून अटक केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काल दि.24 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास टापीबाई रेबला पावरा (वय 67, रा. खैरखुटी, ता. शिरपूर, ह.मु. ताजपुरी) यांनी रात्रीच्या जेवणासाठी माशाची भाजी बनवली होती. मात्र ही भाजी  कुत्र्याने खाल्ल्याने मुलगा आवलेस रेबला पावरा (वय 25) संतप्त झाला. या क्षुल्लक कारणावरून त्याने आईसोबत भांडण केले व नंतर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. गंभीर मार लागल्याने टापीबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मृत महिलेचा नातू निखील रेबला पावरा याने पोलिसांना सविस्तर माहिती दिली.  पोलिसांनी महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय, थाळनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आणि शिरपूर फाटा, टोलनाका, आढे व वाठोडा परिसरात शोध घेतला. शेवटी आरोपी आढे शिवारातील उदवंत सोनार यांच्या केळीच्या शेतात लपलेला आढळून आला. पोलिसांनी त्या शेताच्या चारही बाजूंनी सापळा रचत त्याला पकडले.

गुन्ह्याची कबुली- अटक केल्यानंतर आरोपी मुलगा आवलेस रेबला पावरा (वय 25) याने आईचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मृत महिलेच्या जावई लेदा तेरसिंग पावरा यांच्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात आवलेस पावरा याच्या विरोधात भादंवि कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाची कामगिरी- आरोपीला चार तासात अटक करण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शत्रुघ्न पाटील, पोसई समाधान भाटेवाल, पोहेकॉ संजय धनगर, भुषण रामोळे, पोकॉ उमाकांत वाघ, किरण सोनवणे, योगेश पारधी, रामकृष्ण बोरसे, रणजीत देशमुख, मुकेश पवार, दिलीप मोरे, आकाश साळुंखे व होमगार्ड मनोज कोळी, राजु पावरा यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rain News : नगरमध्ये पावसाच्या सरीवर सरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर शहरात गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी सुरू आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या पावसाचे प्रमाण वाढले असून रविवारी...