Wednesday, October 9, 2024
Homeक्राईमलाल मसाल्यात भेसळ; धुळे एलसीबीने रॅकेटचा केला पर्दाफाश

लाल मसाल्यात भेसळ; धुळे एलसीबीने रॅकेटचा केला पर्दाफाश

दोघे ताब्यात, येथून आणत होते हनिकारक रंग आणि केमिकल्स

धुळे (प्रतिनिधी)- जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने कारवाईचा धडका सुरू केला आहे. शिरपूर तालुका पोलिसांची गांजाची महाशेती हुडकून काढली. त्यापाठोपाठ एलसीबीने मोहाडी हद्दीतील एमआयडीसीत सुरू असलेल्या लाल मसाल्यात हानिकारक रंग आणि केमिकल्सच्या भेसळीचे मोठे रॅकेट पकडले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी इम्रान अहमद  (रा.मुस्लिम नगर, धुळे) आणि मोहम्मद असीम  (रा.धुळे) या दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे हानिकारक रंग आणि केमिकल्स मस्जिद बंदर येथून आणायचे आणि एमआयडीमधल्या भाड्याच्या गाळ्यात हे काम करायचे. ते १२० किलो लाल मसाल्यामध्ये ८ किलो भेसळयुक्त तेल आणि ४० किलो अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग आणि बाकीचे केमिकल्स टाकतात. आणि हा लाल मसाला ११० रुपये प्रती किलो विकत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

- Advertisement -

या कारवाईनंतर पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील कारवाईसाठी पोलिसांनी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे फ़ूड एंड ड्रग कार्यालतील अधिकारी यांना बोलविले आहे. त्यांच्यामार्फत संपुर्ण मुद्देमाल केमिकल एनालिसिससाठी पाठवला जाईल आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाही होईल, अशी माहिती पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.  दरम्यान, या कारवाईमुळे भेसळखोरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या