Sunday, November 3, 2024
Homeजळगावविधानसभेसाठी दिग्गजांचे अर्ज दाखल

विधानसभेसाठी दिग्गजांचे अर्ज दाखल

जिल्हाभरातून २२ उमेदवारांचे २४ अर्ज

जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी जिल्ह्यात दिग्गज उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरूपुष्यामृताचा मुहूर्त साधत उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान जिल्ह्यातून २२ उमेदवारांचे २४ अर्ज दाखल झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत आहे. महायुतीने यादी जाहीर करण्यात आघाडी घेत प्रचाराला देखिल सुरूवात केली आहे. गुरूवारी गुरूपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर महायुतीच्या चार आणि महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज अर्ज दाखल केला. जळगाव जिल्ह्यातून जळगाव शहर मतदारसंघातून ३ उमेदवारांचे ३ अर्ज दाखल झाले असून जळगाव ग्रामीणमधून ३, अमळनेर २, एरंडोल ३, पाचोरा ४ उमेदवारांचे ५ अर्ज, जामनेरातून २ आणि मुक्ताईनगरातून ५ उमेदवारांचे ६ असे २२ उमेदवारांचे २४ अर्ज दाखल झाले आहेत.
दिग्गजांकडून शक्तीप्रदर्शन
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, अजितदादा गटाचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने रस्ते अक्षरश: फुलले होते. ढोलताशांच्या गजरात उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली होती. तर महाविकास आघाडीच्या अ‍ॅड. रोहीणी खडसे यांचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, माजी आ. अरूण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या