Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका रंगेहाथ

शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका रंगेहाथ

मनपा शाळेतील विशेष शिक्षक दांपत्याकडून घेतली दोन लाखाची लाच

धुळे (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (अतिरिक्त कार्यभार) अधीक्षक मिनाक्षी भाऊराव गिरी यांना २ लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज सायंकाळी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत सुरू होते.

- Advertisement -

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या