Thursday, March 13, 2025
Homeक्राईमशिरपूर पं.स.चा लाचखोर कृषि विस्तार अधिकारी रंगेहात

शिरपूर पं.स.चा लाचखोर कृषि विस्तार अधिकारी रंगेहात

धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

धुळे (प्रतिनिधी)-: शिरपूर पंचायत समितीच्या लाचखोर कृषी विस्तार अधिकाऱ्याला आज धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. बोराडी (ता. शिरपुर) येथील स्टेट बँके समोर पाच हजाराची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बुडकी विहीर (ता. शिरपुर) येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराच्या आईच्या नावे सांगवी वनक्षेत्रात वन जमीन आहे. तक्रारदार यांनी आईच्या नांवे या वनजमीनीवर सिंचन विहीर खोदण्यासाठी सन २०२३-२०२४ मध्ये बिरसा मुंडा कृषि कांती योजने अंतर्गत ४ लाख रुपये शासकीय अनुदान मंजुर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह दि.२० एप्रिल २०२२ रोजी ऑनलाईन अर्ज करुन त्यानुसार त्यांना योजनेअंतर्गत विहीर खोदण्याकरीता ४ लाख रुपये शासकीय अनदान मंजुर झाले आहे. त्यानंतर शिरपूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्या आईच्या नांवे मंजुर झालेल्या सिंचन विहीरीच्या जागेची स्थळ पाहणी केली. तसेच तक्रारदार व त्यांच्या आईचा फोटो काढुन नेला होता. त्यावेळी कृषि विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांना विहीरीचे लाईन आउट करतेवेळी ५ हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी काल दि. 7 रोजी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची आज दि.९ रोजी एसीबीने पडताळणी केली असता कृषि विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम बोराडी, ता. शिरपुर येथील स्टेट बँके समोर स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

- Advertisement -

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...