Saturday, May 3, 2025
Homeधुळेसंपूर्ण महाराष्ट्रात घरफोडी करणारी 'खिडकी गँग’ धुळ्यात जेरबंद

संपूर्ण महाराष्ट्रात घरफोडी करणारी ‘खिडकी गँग’ धुळ्यात जेरबंद

15 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन गुन्ह्यांची उकल; धुळे एलसीबीची जबरदस्त कामगिरी

धुळे : प्रतिनिधी – खिडकीची ग्रिल काढून घरात प्रवेश करून चोरी करणाऱ्या ‘खिडकी गँग’चा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. महाराष्ट्र भर पाहिजे असेलेल्या अतिशय सराईत पाच चोरट्यांना अटक केली. या टोळीने साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील एका घरातून लग्नासाठी जमवलेले सोनं व रोकड असा 12 लाख 78 हजाराचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी या टोळीकडून कारसह दागिने असा एकूण 15 लाख 66 हजाराचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरातील साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील रघुनाथ सोनार यांच्या घरातील खिडकीची ग्रिल तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी जमविलेले सोनं व रोख रक्कम असा एकूण 12 लाख 78 हजार 805 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना दि.4 ते 5 डिसेंबर 2024 रोजी दरम्यान रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला.

- Advertisement -

तपासादरम्यान पथकाला घटनास्थळी पहाटेच्या सुमारास फिरणारी पांढऱ्या रंगाची कार आढळली. टोल नाक्यावरील फास्टॅग रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल टॉवर्सवरील डेटाच्या साहाय्याने तब्बल 600 मोबाईल क्रमांक, 100 सीसीटीव्ही क्लिप्स आणि 20 टोल नाक्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहन व फास्टॅगशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं. संशयित क्रमांकाची कार पुन्हा धुळे परिसरात आल्याचे निदर्शनास येताच 24 एप्रिल रोजी एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली.

अटक आरोपींची नावे अशी आहेत – शेख अशफाक शेख आसिफ (रा. मोहम्मदीया कॉलनी, आझादनगर, बीड), आगामिर पठाण (रा. तेलगाव नाका, बीड), फिरोज शेख (रा. घोडेगाव, नेवासा), ऐफाझ शेख (रा. पिंपळगाव, गेवराई) आणि शेख कलीम शेख अलीम (रा. दहिफळ, बीड). त्यांच्या ताब्यातून 31 हजाराचे 5 मोबाईल, रोख 2 हजार रुपये, चोरीत वापरलेले स्क्रू ड्रायव्हर व कटावणी, 4 लाखरुपये किंमतीची आय-20 कार असा एकूण 4 लाख 33 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींनी चोरीचे सोनं गहाण ठेवले असल्याचे उघड झाले असून त्यामधून 98.49 ग्रॅम वजनाचे 10 लाख 12 हजार रुपये किमतीचे दागिने व देवपूर येथील लक्ष्मी कॉलनीतील घरफोडीतील 12.30 ग्रॅम सोनं 1 लाख.20 हजार रुपये किंमतीचे असा एकूण 11 लाख 33 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला. या टोळीतील मुख्य आरोपी शेख अशफाक याच्यावर राज्यातील विविध पोलिसात यापूर्वी 24 घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. तर आगामिर खान याच्यावरही २० गुन्हे नोंद असून कलिम शेख हा याच्यावर ९ गुन्हे व फिरोज रेहमान शेखवर एका गुन्ह्याची नोंद आहे. या टोळक्याने बहुतांश गुन्हे बीड, पुणे जिल्हा, नाशिक, जालना, बुलढाणा भागात केलेले आहेत  त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, असई संजय पाटील पोहेकॉ मच्छिद्र पाटील, संदीप पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, पोकॉ अमोल जाधव यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माघार घेता घेता…काका झाले आमदार

0
श्रीराम जोशी| 9822511133 पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस मला आजही आठवतो....2009मधील विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवारी माघारीचा तो शेवटचा दिवस होता... काँग्रेसकडून...