Friday, September 20, 2024
Homeक्राईमसाखरपुड्यातच अल्पवयीन मुलीचे लग्न, अत्याचाराने गरोदर

साखरपुड्यातच अल्पवयीन मुलीचे लग्न, अत्याचाराने गरोदर


धुळे । (प्रतिनिधी) : साखरपुड्यातच अल्पवयीन मुलीशी लग्न लावून दिले. तर पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिला गरोदर केले. याप्रकरणी पतीसह दोघांच्या आई-वडीलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत नाशिक जिल्ह्यातील कळवण ग्रामीण पोलिस ठाण्याचे हवालदार शिवाजी बोरसे यांनी साक्री पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत मुलगी ही अल्पवयीन असतांना देखील तिची आई इंदिरा पोपट बागुल, वडील पोपट पांडुरंग बागुल (रा. कोठरे ता. कळवण) तसेच पिडीतेची सासु रंजना भरत सोनवणे, सासरे भरत सोनवणे (रा. निळगव्हाण पो.विटाई ता. साक्री) यांनी पिडीतेचा अर्चित सोनवणे याच्यासोबत त्यांच्या गावी निळगव्हाण येथे जुन 2023 मध्ये साखरपुड्यातच विवाह लावून दिला. त्यानंतर अर्चित सोनवणे याने वेळोवेळी पिडीतेसोबत शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिला गरोदर केले. म्हणून वरील पाच जणांवर साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पीएसआय रौदळ करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या