Tuesday, July 23, 2024
Homeजळगावसावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख शास्री भक्तीकिशोर दास ब्रम्हलिन

सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख शास्री भक्तीकिशोर दास ब्रम्हलिन

सावदा | प्रतिनिधी –

- Advertisement -

अध्यात्मिक क्षेत्रासह कथानिपुण तसेच गुरुकूल परंपरा परिसरात रुजवणारे शिक्षण क्षेत्रातील एक उदयोन्मुख सदाप्रसन्न व्यक्तिमत्व, सावदा स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी हे आज दि.२८ रोजी भुसावळ येथे ब्रम्हलीन झाले. सावदा येथील स्वामीनारायण देवस्थानचे ते प्रमुख कोठारी होते. त्यांच्या इहलोकात जाण्याने शोककळा पसरली आहे.

सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुलाचे प्रमुख कोठारी शास्त्री किशोरदासजी (वय ४५) यांची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाल्याने त्यांना भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शास्त्रीजी यांची सावदा येथील गुरुकुलाचे प्रमुख म्हणून केलेली कामगिरी ही अतिशय लक्षणीय राहिली. परिसरात त्यांचा मोठ्या प्रमाणात भक्त परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे परिसरातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या