Friday, September 20, 2024
Homeक्राईमसेवानिवृत्त एएसआयकडून लाच घेणे भोवले

सेवानिवृत्त एएसआयकडून लाच घेणे भोवले

एसपी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक गजाआड

धुळे | प्रतिनिधी – येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील लेखा शाखेतील लाचखोर वरिष्ठ लिपीक सुनिल गावित यास धुळे एसीबीच्या पथकाने गजाआड केले. सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाकडुन २ हजारांची लाच स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

तक्रारदार जिल्हा पोलीस दलातुन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरुन सन २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजुर होवुन मिळण्यासाठी दि. १० जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज केले होते. त्यापैकी त्यांना १ लाख २९ हजार ८८८ रुपयांचे बिल त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे उर्वरीत बिलांबाबत लेखा शाखेचे वरिष्ठ लिपीक सुनिल वसंत गावित यांची कार्यालयात भेट घेवुन चौकशी केली. तेव्हा वरिष्ठ लिपीक सुनिल गावित यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलांच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिले काढुन देण्याचे काम करुन देण्यासाठी कोषागार कार्यालयातील कर्मचार्‍याच्या नावाने २ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे त्यांनी तशी तक्रार आज दि.२ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे समक्ष येवुन दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात जावुन पडताळणी केली असता लेखा शाखेचे वरिष्ठ लिपीक सुनिल गावित यांनी तक्रारदाराकडे कोषागार कार्यालयातील कर्मचार्‍याच्या नावाने २ हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या