Monday, October 14, 2024
Homeधुळेहोळनजीक भल्या पहाटे भिषण अपघात, ...

होळनजीक भल्या पहाटे भिषण अपघात, चालकासह 5 जागीच ठार, 4 गंभीर

दोंडाईचा (श.प्र)- शिंदखेडा तालुक्यातील होळ गावानजीक आज भल्या पहाटे भिषण अपघात झाला. भरधाव पिकअप वाहनाने व्हॅनला जोरदार धडक दिली. त्यात व्हॅन चालकासह पाच जण जागीच ठार झाले. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरूष व तीन महिलांचा समावेश आहे.

शिंदखेडा तालुक्यातील भाविक नरडाणा येथे भागवत कथेसाठी गेलेले होते. कथा आटोपल्यानंतर ते पहाटे दीड वाजेच्या सुमारास एमएच 18 बीएक्स 0539 क्रमांकाच्या इको व्हॅनद्वारे गावाकडे निघाले. त्यादरम्यान होळ गावा शिवारात शिंदखेडा- होळ रस्त्यावर त्यांच्या व्हॅनला समोरून भरधाव येणार्‍या एमएच 04 ईवाय 6021 क्रमांकाच्या बोलरो पिकअपने जोरदार धडक दिली. त्यात व्हॅनमधील सर्व आठ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील काही ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी जखमींना बाहेर काढून शिंदखेडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यात मंगलबाई लोटन देसले (वय 59), मयुरी पितांबर खैरनार (वय 28), विशाखा अप्पा महाजन (वय 13) तिघे रा. शिंदखेडा व सुनिल दंगल कोळी (वय 30 रा. पडसामल ता.शिंदखेडा) यांना डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. तर व्हॅन चालक जयेश गुलाब बोरसे (वय 22 रा.वारूळ ता.शिंदखेडा) याला नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमी आशा आप्पा माळी, प्रेम संदिप पाटील, खुशाल अरूण चौधरी व बोलेरो वाहन चालक सचिन चौधरी (रा.शिंदखेडा) यांना धुळे जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. 

- Advertisment -

ताज्या बातम्या