Monday, March 31, 2025
Homeधुळेअखेर धुळे येथील शिव सैनिकांवर गुन्हा दाखल

अखेर धुळे येथील शिव सैनिकांवर गुन्हा दाखल

धुळे –

येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिव सैनिकांनी केलेल्या राडाबद्दल शिक्षणाधिकारी डॉ सुभाष बोरसे यांनी गुन्हा दाखल केला आहे. यात आजी माजी पदाधिकाऱ्यासह 20 जणांचा समावेश आहे.

- Advertisement -

शहरातील काही शाळा जास्तीचे शुल्क व डोनेशन घेतात, त्यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी शिवसैनिकांनी शिक्षणाधिकारी डॉ बोरसे यांची भेट घेत घेतली. चर्चेप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला, असा शिव सैनिकांचा आरोप असून त्यांनी या कार्यालयातील फाईल्स फेकून देत डॉ बोरसे यांना धक्काबुक्कीही केली. यासंदर्भातत्यांनी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे . यात महानगर प्रमुख संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, माजी महानगर प्रमुख भुपेंद्र लहामगे, धीरज पाटील, विजय भट्टड, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे,रामदास कानकाटे, पुरुषोत्तम जाधव यांच्या सह 20 जणांचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 MI vs KKR : आज मुंबई-कोलकाता लढत; MI विजयाचे...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) सायंकाळी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट...