Wednesday, October 16, 2024
Homeक्राईमअति दुर्गम भागातील सामूहिक गांजा शेतीवर छापा; तीन ताब्यात

अति दुर्गम भागातील सामूहिक गांजा शेतीवर छापा; तीन ताब्यात

शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई, १७ लाखांचा माल जप्त, सहा जणांवर गुन्हा

धुळे | प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या महादेव दोंदवाडा गाव शिवारातील वनजमिनीवरील सामुहिक गांजा शेतीवर काल शिरपूर तालुका पोलिसांनी आपला नांगर फिरविला. या कारवाईत पिकअप वाहन, दुचाकीसह ७२० किलो गांजाची झाडे, असा एकूण १७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच तीन जणांना पकडण्यात आले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव दोंदवाड शिवारातील वनजमिनीवर काही जण सामुहिकरित्या गांजा पिकाची लागवड करुन देखभाल करीत असल्याची गोपनिय माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी ड्रोनकॅमेरा मन अंमलदार, आरसीपी पथकाला सोबत घेत काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शेतात छापा टाकला. तेव्हा नवसिंग जुम्मा पावरा (वय ३०), देविलाल जुम्मा पावरा (वय २५) व सुमनबाई प्रभुदास उर्फ प्रभुजी ठाकोर (पावरा) रा. महादेव दोंदवाडा हे तिघे गांजा पिकाची मशागत करतांना मिळून आले. तर प्रविण मगन पावरा, सुरेश करमसिंग पावरा व सुनिल थाबर्‍या पावरा हे जंगलात पळुन गेले.
एकुण १४ लाख ४० हजारांची ७२० किलो गांजाची झाडे, अडीच लाखाचे एमएच ४६ एएफ १२४६ क्रमांकाचे पिकअप वाहन व ५० हजारांची एमएच १८ सीबी ५४५७ क्रमांकाची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोहेकॉं सागर ठाकुर यांच्या फिर्यादीवरून प्रविण मगन पावरा, चिक्का उर्फ देविता जुम्मा पावरा, नवसिंग जुम्मा पावरा, सुरेश करमसिंग पावरा, सुमनबाई प्रभुदास उर्फ प्रभुजी ठाकोर व सुनिल थावर्या पावरा सर्व (रा.दोंदवाड ता.शिरपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सुनिल वसावे करीत आहेत. गुन्ह्यातील अटकेती तिघांना दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे, किशोर चव्हाण पोहेकॉ सागर ठाकुर, चत्तरसिंग खसावद, राजु ढिसले, पोकॉं मुकेश पावरा, प्रकाश भिल, ग्यानसिंग पावरा, रोहिदास पावरा, धनराज गोपाळ, भुषण पाटील, अल्ताफ मिर्झा, इसरास फारुकी प्रतिभा देशमुख व शिरपूर आरसीपी पथक यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या