Thursday, November 21, 2024
Homeक्राईमअरे बापरे… विम्यासाठी मुलाच्या अपघाताचा बनाव

अरे बापरे… विम्यासाठी मुलाच्या अपघाताचा बनाव

पोलिसांनी आणला उघडकीस, आईसह पाच जणांवर गुन्हा

धुळे (प्रतिनिधी)- अरे बापरे… मयत मुलाच्या विम्याचा लाभ घेण्यासाठी चक्क अपघाताचा बनाव केल्याला धक्कादायक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. मयताच्या आईसह पाच जणांनी केलेला हा बनाव शिंदखेडा पोलिसांनी मोठ्या हुशारीने उघडकीस आणला. याप्रकरणी मयताच्या आईसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज गुलाब झिंगाभाई (वय ३१ रा. शनिमंदिर प्रकाशा ता.शहादा जि नंदुरबार) असे मयताचे नाव आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला असताना देखील त्याची आई रेखा गुलाब झिंगाभोई (रा. प्रकाशा ता शहादा जि नंदुरबार) व गणेश बळीराम भोई, विशालभाई इंद्रेकर, राहुल राजेश परदेशी, ईश्वर सिताराम परदेशी यांनी विमा कंपनीची फसवणुक करण्यासाठी कट रचला. मनोज गुलाब झिंगाभोई हा मयत झालेला असतांना देखील त्याच्या नावावरील विम्याचे पैसे मिळावेत, या उद्देशाने व नैसर्गिक मृत्यु झाल्याचा पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने त्यांचे प्रेत शिंदखेडा तालुक्यातील आशापुरी मंदिराचे पुढे एक किलोमिटर सुकवद गावाकडेस आणले. तेथे ईश्वर सिताराम परदेशी याने त्याच्या अपघात झाल्याचा बनाव करुन स्वतःच्या दुखापतीस कारणीभुत झाला. तसेच शिंदखेडा ग्रामिण रुग्णालय येथील कर्मचारी यांना मयत मनोज हा अपघातात मयत झाला, अशी खोटी माहीती दिली. हा प्रकार काल दि.२६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक ते साडेतीन वाजेदरम्यान घडला.

- Advertisement -

याबाबत पोकॉ पंकज कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिसात वरील पाच जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८(४), ६२, २८१, २२५, १२५अ, २३८, २१७, ६१ (२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या