Friday, April 25, 2025
Homeनगरआंबी खालसा फाट्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात

आंबी खालसा फाट्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात

घारगाव (वार्ताहर)– पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यावरील गतिरोधकावर मालवाहू ट्रकने भरधाव वेगात येऊन तीन वाहनांना जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या विचीत्र अपघातात टेम्पो महामार्गाच्या कडेला पलटी झाला तर इर्टीका कारमधील दाम्पत्य थोडक्यात बचावले. ही घटना काल रविवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली.

मालवाहू ट्रक क्रमांक जी.जे. 07 वायझेड 1738 हिच्यावरील चालक रविवारी सकाळी संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. त्याच दरम्यान दुसरा मालवाहू ट्रक क्रमांक जीजे 05 बीएक्स 7731 हा पुढे चालला होता आणि ट्रकच्या पुढे इर्टीका क्रमांक एमएच 17 बीएस 0689 तर छोटा हत्ती टेम्पो क्रमांक जीजे 06 ए झेड 9037 हिच्यावरील चालक हा टेम्पो महामार्गाच्या कडेला उभा करून नाश्त्यासाठी समोर असलेल्या हॉटेलमध्ये थांबला होता. त्याच दरम्यान भरधाव वेगात येणार्‍या मालवाहू ट्रकने या तीन्ही वाहनांना जोराची धडक दिली. त्यामध्ये टेम्पो महामार्गाच्या साईड रोडवर पडला.

- Advertisement -

अपघाताच्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. इर्टीका कारमधील रामनारायण बूब, लता रामनारायण बूब दाम्पत्य सुखरुप बचावले. विचीत्र अपघातामध्ये चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आंबीफाट्यावर असलेल्या गतिरोधकची उंची प्रमाणापेक्षाही मोठी असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...