Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधआम्ही जिगरबाज

आम्ही जिगरबाज

ऑलिम्पिक (Olympic) आणि पॅरालिम्पिक (Paralympic) स्पर्धांमधल्या यशानंतर आता ऑलिम्पिकनंतर आता पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारतीय खेळाडूंचा (Indian players) दबदबा पहायला मिळाला. यंदाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी करून दाखवली. आपल्या खेळाडूंनी एकोणीस पदके पटकावत, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या खेळाडूंनी अपंगत्वामुळे आलेल्या शारीरिक मर्यादांना (Physical limitations) दूर सारत स्वत:ला सिद्ध केले. हे खेळाडू दुर्दम्य आशावाद (optimism) आणि दृढनिश्चयाचे (Of determination) मूर्तीमंत प्रतीक (Symbol) ठरले आहेत.

आयुष्य म्हटले की चढ-उतार आले, अडचणी आल्या. यश आणि अपयश या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. पण अनेकजण छोट्याशा अपयशाने, संकटाने खचून जातात, नाउमेद होतात. काही जण प्रसंगी टोकाचे पाऊलही उचलतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात अनेक संधी दार ठोठावत असतात. गरज असते ती या संधी साधण्याची.

आयुष्यातल्या प्रत्येक संकटावर जिद्दीने मात करण्याची! नशीबही धाडसी माणसाच्या बाजूने असते, असे म्हणतात.

- Advertisement -

‘सच और साहस हो जिसके मन में,

अंत में जीत उसी की रहे’

हे शब्द पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी खरे करून दाखवले आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल 19 पदके पटकावत नवा विक्रम नोंदवला. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे भारताने अकरा पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये मिळून बारा पदके पटकावली होती आणि यंदा एकाच स्पर्धेत 19 पदके पटकावत कमाल केली.

याच कारणामुळे त्यांची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या स्पर्धेत भारताने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके पटकावली. 2016 च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या नावे तीन पदके होती. यंदा पदकांच्या संख्येत मोठी भर पडली आहे.

शारीरिक अपंगत्व, सोयी-सुविधांचा अभाव, आर्थिक चणचण अशा अनेक समस्या, अडचणींवर मात करत त्यांनी हे देदीप्यमान यश मिळवले आहे.

उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूने भारताला पहिले यश मिळवून दिले होते तर पॅरालिम्पिकमध्येही एका महिलेने म्हणजे भाविना पटेलने विजयी सुरुवात करून दिली. अजून एक योगायोग म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेत अखेरच्या दिवशी नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावत भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेचा शेवट गोड केला होता तर पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नागरने बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला.

पॅरालिम्पिकमध्ये यश मिळवणार्या प्रत्येक खेळाडूची कथा वेगळी, गाथा वेगळी, पार्श्वभूमीही वेगळी. मात्र विजिगीषु वृत्ती, दृढनिश्चय आणि मुख्य म्हणजे आपण कोणापेक्षाही कमी नाही, ही भावना हाच या सर्व खेळाडूंमधला समान धागा म्हटला पाहिजे.

पॅरालिम्पिक स्पर्धेत भाविना पटेल आणि अवनी लेखरा या दोन खेळाडूंनी पदके पटकावली. अवनीने तर सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदके पटकावली. भाविनाने पॅरालिम्पिक इतिहासात टेबल टेनिसमधले पहिले पदक भारताला मिळवून दिले. भविनाने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसमध्ये पदार्पण केले.

2011 मध्ये तिने पहिले पदक पटकावले. पॅरा टेबल टेनिस थायलंड ओपनमध्ये भाविनाला रौप्य पदक मिळाले होते. 2013 मधल्या आशियाई रिजनल चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने भारतासाठी पहिले पदक पटकावले. भाविना जॉर्डन, चीन, जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन आणि नेदरलँड्ससारख्या देशांमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळते.

अवघ्या एक वर्षांची असताना तिचा पाय लुळा पडला. भाविनाला पोलिओचे निदान झाले. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातल्या भाविनावर सुरुवातीच्या टप्प्यात उपचार होऊ शकले नाहीत. तिच्यावर विशाखापट्टणममध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर फारशी काळजी न घेतल्यामुळे तिच्या तब्बेतीत सुधारणा होऊ शकली नाही.

त्यामुळे तिला लहानपणीच व्हिलचेअर जवळ करावी लागली. भाविना सर्वसामान्य शाळेत शिकली. 2004 मध्ये वडिलांनी तिला अहमदाबादच्या ब्लाईंड पीपल्स असोसिएशनमध्ये दाखल केले. इथून तिने पदवी पूर्ण केली. कॉम्प्युटरचे ज्ञान मिळवले. इथेच प्रशिक्षक लालाह दोषी भेटले आणि तिचे आयुष्य बदलून गेले.

देवेंद्र झांझरियाने भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. आठ वर्षांचा असताना शॉक लागल्यामुळे देवेंद्रचा डावा हात कोपरापासून कापावा लागला. या घटनेनंतर त्याने घराबाहेर पडणे बंद केले. पण आईने त्याला उभारी दिली. आज देवेंद्र पॅरालिम्पिक स्पर्धेत तीन पदके पटकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

बॅडमिंटनमधल्या एसएच 6 विभागात कृष्णा नागरने सुवर्णपदक पटकावले. एका जन्मजात आजारामुळे कृष्णाची उंची फारशी वाढू शकली नाही. पण त्याने क्रीडाक्षेत्रात वेगळीच उंची गाठली. कृष्णा घरापासून तेरा किलोमीटर अंतरावरच्या मैदानात जाऊन सराव करत असे. कृष्णाच्या या कष्टांचे चांगलेच चीज झाले. बॅडमिंटनमध्ये भारताचे सात खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी तीन खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. प्रमोद भगतने एसएल 3 विभागात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले तर याच विभागात मनोज सरकारला कांस्य पदक मिळाले.

मनोज सरकारचे बालपण गरिबीत गेले. दीड वर्षांचा असताना मनोजला ताप आला होता. त्यावेळी त्याच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याचे पाय अधू झाले. आईने शेतात काम करून पैसे जमवले आणि मनोजला बॅडमिंटन रॅकेट घेऊन दिली. हाच मनोज आज पॅरालिम्पिक पदक विजेता आहे. नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणार्‍या मनीष नरवालला फुटबॉल खेळायचा होता. पण अपंगत्वामुळे त्याला नेमबाजीकडे वळावे लागले. मात्र यामुळे निराश न होता त्याने सर्वस्व पणाला लावले.

मनीषने पॅराआशियाई स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. त्याला 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नेमबाजीत कांस्यपदक पटकावणार्‍या सिंहराज अधानालाही हलाखीचे दिवस बघावे लागले. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सिंहराजने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. पतीच्या खेळाप्रतीच्या प्रेमापोटी त्याच्या पत्नीने दागिनेही विकले. सिंहराजने पॅरालिम्पिकमध्ये पदक पटकावून स्वत:ला सिद्ध केले आहे.

बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक पटकावणारा सुहास यथीराज आयएएस अधिकारीही आहे. त्याने अनेक अडथळ्यांवर मात करत हे यश मिळवले आहे. सुहास 2007 मध्ये आएएस अधिकारी झाला. त्यानंतर वेळात वेळ काढून त्याने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. 2016 मध्ये त्याने आशियाई पॅरा बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. आता त्याने पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवली आहे.

या खेळाडूंच्या संघर्षातून, समर्पण वृत्तीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. आयुष्यात कधीही हार मानायची नसते, नेहमीच ताठ मानेने उभे रहायचे असते आणि स्वत:ला कधीही कमी लेखायचे नसते हाच संदेश या कर्तबगार खेळाडूंनी दिला आहे. शारीरिकच काय, कोणतीही मर्यादा आपल्याला रोखू शकत नाही, हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

भाविना टेबल टेनिस खेळू लागली. तिने खूप मेहनत घेतली. सगळे लक्ष खेळावर केंद्रित केले. 2007 मध्ये तिने राष्ट्रीय स्पर्धेत पहिले पदक पटकावले. त्यानंतर मागे वळून बघितले नाही आणि आता तिचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पूर्ण झाले. अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. त्यानंतर तिने 50 मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. अवनीला अपघातामुळे अपंगत्व आले. त्यावेळी ती अवघ्या अकरा वर्षांची होती. पाय अधू झाल्यामुळे तिला व्हिलचेअरवर बसावे लागले. मन रमवण्यासाठी तिला एखादा खेळ खेळण्यासाठी पाठवावे, असा विचार तिच्या वडिलांच्या मनात आला. खूपच अशक्त झाल्यामुळे तिला नेमबाजीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला. सुरुवातीला तिला बंदूकही उचलता येत नव्हती.

अवनीने नेमबाजीचा प्रचंड सराव केला. करोनाकाळात शूटिंग रेंज बंद असतानाही ती शांत बसली नाही. तिच्यासाठी घरी डिजिटल टारगेट आणण्यात आले. अवनीने त्यावर सराव केला. एकेकाळी बंदूकही उचलू न शकणार्‍या अवनीने आज दोन ऑलिम्पिक पदके पटकावली आहेत. भालाफेकीत सुवर्णपदक पटकावणार्‍या सुमित अंतिललाही 2015 मध्ये एका अपघातात पाय गमवावा लागला.

सुमितला कुस्ती खेळायची होती. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे स्वप्नही त्याने बघितले होते. नंतर त्याला पॅरालिम्पिक स्पर्धेची माहिती मिळाली. प्रशिक्षकांनी त्याला भालाफेक करण्याचा सल्ला दिला. सुमितने अथक परिश्रम केले आणि अखेर पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक पटकावले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या