Friday, November 22, 2024
Homeधुळेआ.जयकुमार रावल हे आधुनिक भगिरथ: ना.देवेंद्र फडणवीस

आ.जयकुमार रावल हे आधुनिक भगिरथ: ना.देवेंद्र फडणवीस

शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांसाठी पीडीएन योजनेचा शुभारंभ

दोंडाईचा- कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या या भागाचे भविष्य बदलविणारी सुलवाडे-जामफळ ही २४०० कोटींची योजना व त्यातून शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांमध्ये बंदीस्त पाईपलाईन द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविणारी योजना आपल्या प्रयत्नानी आणून जयकुमार रावल हे आधुनिक भगीरथ ठरले असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमुळे इंडट्रीज मॅग्नेटमध्ये धुळ्याचे नाव येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जामफळ धरणातून शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांच्या शेतापर्यंत बंदीस्त पाईपलाईनद्वारे पाणी पोहचविणाऱ्या पीडीएन योजनेचा शुभारंभ सोहळा जामफळ धरण येथे संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे, शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल, खा.डॉ.शोभा बच्छाव, आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, आ.मंजुळ गावीत, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, जि.प.अध्यक्षा सौ.धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, बाजार समिती सभापती नारायण पाटील, जि.प.महिला बालकल्याण सभापती ज्योती देवीदास बोरसे, शिक्षण व आरोग्य सभापती सोनी पंकज कदम, हर्षवर्धन दहिते, पंस सभापती छाया रणजित गिरासे, माजी अध्यक्ष तुषार रंधे, सुभाष देवरे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, भाजप धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, सीईओ विशाल नरवडे, माजी महापौर प्रदीप कर्पे, डॉ. माधुरी बोरसे, माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल, भारत ईशी, माजी सभापती जिजाबराव सोनवणे, उपसभापती दीपक मोरे, बाजार समिती उपसभापती प्रा. आर जी खैरनार, माजी नगराध्यक्ष अनिल वानखेडे, धुळे तालुक्याचे नेते बाळासाहेब भदाणे, जि.प.सदस्य राम भदाणे, जि.प.सदस्या संजीवनी सिसोदे, प्रभाकर पाटील, नथा पाटील, विक्रम तायडे, लखन रुपनर, सुरज देसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisement -

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, कायमस्वरुपी दुष्काळी असलेला या भागाचे आता चित्र बदलणार असून आपली सुरूवात दुष्काळाकडून सुकाळाकडे होईल, हरितक्रांतीकडे आपली वाटचाल होईंल तसेच मनमाड-धुळे-इंदौर रेल्वे मार्ग, ६ राष्ट्रीय महामार्ग, सिंचन पाण्याचे प्रकल्प यामुळे महाराष्ट्राचे इंडट्रीज मॅग्नेट म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजी नगर आणि नागपूर म्हटले जाते पण यात आता भविष्यात धुळ्याचे नाव असेल, असा विश्‍वासही फडणवीस यांनी धुळे जिल्ह्यातील जनतेला दिला आणि येणार्‍या विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी आ.जयकुमार रावल यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन देखील शिंदखेडा तालुक्यातील जनतेला केले.

मोदी है तो मुमकिन है, सुलवाडे-जामफळ
योजनेसाठी २४०० कोटी रुपये दिले

धुळे जिल्ह्यातील लोकांना कधी वाटले नव्हते की आपली सुरूवात दुष्काळाकडून सुकाळाकडे होईल, हरितक्रांतीकडे आपली वाटचाल होईंल. परंतू केंद्रात नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करीत आहोत. या जिल्ह्यातील दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसत आहोत. १९९९ ला तत्कालीन युती सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली होती. युती सरकार गेल्यानंतर १४ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आले. या सरकारने सुलवाडे-जामफळ या प्रकल्पासाठी केवळ २६ कोटी रूपये दिले. खरेतर महागाईचा दर बघितला तर या २६ कोटीच्या कितीतरी पट किंमती वाढत गेल्या. परंतू त्याच्याशी त्या सरकारला देणे घेणे नव्हते. जेव्हा आमचे सरकार राज्यात आणिक केंद्रात आले तेव्हा आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे विनंती केली व महाराष्ट्रातील दुष्काळाची जाणीव करून दिली. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश्य भागावर लक्ष केंद्रीत करावे लागेल असे सांगण्यात आले. संपूर्ण देशात एकमेव महाराष्ट्र राज्य असे होते की ज्याला बळीराजा कृषी संजीवनी योजना मिळाली. आणि यात सुलवाडे-जामफळ योजनेसाठी तब्बल २४०० कोटी रूपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. हा प्रकल्प कुठल्याही मान्यते शिवाय होता,, असे त्यावेळी लक्षात आले. पण मोदी है तो मुमकीन है आम्ही त्यांना विंनती केली. आणि मोदीजींनी हा प्रकल्प या योजनेत घ्यायचे सांगितले. या प्रकल्पाचे काम आता जवळपास पूर्णत्वासकडे आले आहे. १६ वर्षात महाविकास आघाडी सरकारचे २६ ते आमचे केवळ अवघ्या पाच वर्षात २४६० कोटी रूपये आमच्या सरकारने या प्रकल्पासाठी दिले. यामुळे तालुक्यातील गावांचे चित्र बदलणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पामुळे होणारा लाभ कसा असेल याबद्दल माहिती दिली. तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला परंतू पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. या नव्या पिढीला सांगायचे की दुष्काळ आता इतिहास जमा झाला आहे. हे सर्व डॉ. भामरे व आ. जयकुमार रावल यांच्यामुळे शक्य झाले आहे. यांच्यासारखे लोकप्रतिनिधी असले तर चित्र बदलू शकते, हे आता सगळ्यांना दिसले आहे. या प्रकल्पामुळे धुळे तालुक्यातील ४९ गावांचे चित्रही बदलणार आहे. भविष्यात शेतीसाठी लागणारी वीज सौरउर्जेतून उपलब्ध करून देण्यात येईल, यामुळे रात्रीची नाही तर संपूर्ण दिवसभर वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे वीज बिलाचा प्रश्‍न राहणार नाही. सुलवाडे-जामफळ या योजनेसाठी भविष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही. व धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसा सिंचन योजनांना आपण ११५ कोटी रूपये दिले. प्रकाशा-बुराईसाठी ७९४ कोटी दिले. यामुळे धुळे व नंदुरबार मधील शेतकर्‍यांना फायदा होईल. नार पार प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे जाणारे पाणी अडवून त्याचा लाभ उत्तर महाराष्ट्रील जिल्ह्यांना देण्याईत येईल. वर तोंड करून तुमच्या पर्यंत येणार्‍या लोकांना विचारा की ५-७ वर्षात कामे मार्गी लावण्यात आली. तुम्ही हे काम गेल्या ५० वर्षात का करू शकले नाहीत. शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी का अडवले नाही, शेतकर्‍यांना दुष्काळमुक्त का केले नाही, याचा जाब विचारला पाहिजे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा सर्वात जास्त फायदा धुळे जिल्ह्याला होणार आहे यामुळे धुळे जिल्ह्याचे चित्र बदलणार आहे.

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमुळे
इंडट्रीज मॅग्नेटमध्ये धुळ्याचे नाव

महाराष्ट्राचे इंडट्रीज मॅग्नेट म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजी नगर आणि नागपूर म्हटले जाते पण यात आता भविष्यात धुळ्याचे नाव असणार आहे. कारण सहा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेची कनेक्टीव्ही तसेच सिंचनाची सोय याठिकाणी उपलब्ध झाली आहे, अशी पुरक स्थिती अन्य कुठेही नाही. यामुळे अनेक जण आम्हाला या भागात जागा मिळावी म्हणून संपर्क साधत आहेत. याठिकाणी औद्योगिकी करणासाठी गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा आहे अनेकजण उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. हे केवळ मोदी सरकार व महायुतीच्या सरकारमुळे शक्य झाले आहे. मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी मा.खा.डॉ. भामरे यांच्यासह आपण उद्धजींच्या सरकारकडे आपण गेलो होते. राज्याच्या हिस्स्याबाबत आपण त्यांना समजावून सांगितले होते. ममता बॅनर्जी या आमच्याशी भांडत असल्या तरी रेल्वेचा प्रकल्प आला की ५० टक्के हिस्स्याची जबाबदारी घेतात कारण तो त्यांच्या फायद्याचा असतो. बिहार आणि झारखंड येथेही ५० टक्के रक्क्म दिली जाते. यांनी मात्र एक नया पैसा देणार नाही असे सांगितले सगळे पैसे अडवले पुन्हा आपले सरकार आले आणि पहिल्या झटक्यात मी पत्र दिले की, आम्ही ५० टक्के हिस्स्याची रक्कम द्यायला तयार आहोत. केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली. पाच वर्षानंतर येथील सर्व चित्र बदलेले असेल सुजलाम-सुफलामचा नेमका अर्थ काय असतो ते या धुळे जिल्ह्यात पहायला मिळेल. इन्फ्रक्ट्रक्चर आणि लोकहिताची कामे आपण करत आहोत. लाडकी बहिण योजनेचा उपमुख्यमंत्री फडणीस यांनी उल्लेख करीत पैसे मिळाले असतील त्यांनी हात वर करावे असे आवाहन केले ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत त्यांच्याही खात्यावर पैसे येतील अणि ही योजना पाच वर्ष अखंड सुरू राहील असे आश्‍वासन दिले. ही योजना बंद करावी अशी मागणी कॉंग्रेसच्या काही प्रतिनिधींनी न्यायालयात केली. परंतू ही योजना बंद होणार नाही. आ. जयकुमार रावल यांनी केलेली प्रत्येक मागणी पूर्ण करून देऊ आणि या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी सांगितले.

मला मंत्रीपद नको, पण पीडीएन योजना द्या असा आग्रह आ. रावल यांनी माझ्याकडे केला
आ. जयकुमार रावल हे माझ्याकडे आले अन म्हणाले की, मला मंत्रीपद दिले नाही दिले तरी चालेल परंतू माझ्या मतदारसंघाला या पीडीएन योजना द्या, अशी आग्रही मागणी त्यांनी केली, आ. रावल यांनी मागितल्यानंतर त्यांना आपण कधीही अन काहीही नाही म्हणतच नाही त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव मी ही ५४ गावांचे भविष्य बदलविणारी पी डी एन योजना मंजूर केली, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या