Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजएकनाथ शिंदे यांच्या विजयी आमदाराच्या अडचणी वाढणार? न्यायालयात याचिका दाखल

एकनाथ शिंदे यांच्या विजयी आमदाराच्या अडचणी वाढणार? न्यायालयात याचिका दाखल

जालना | Jalna
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. पण विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तर काही मतदार संघात फेरमतमोजणीचे मागणी होते आहे. या सर्व घडामोडी सूरू असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपल्ली आणि पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या नामनिर्देशन पत्र सोबत सादर केलेल्या शपथबद्ध शपथपत्रावर मतदान पूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता. परंतु सदर अक्षेपावर निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. कारण शपथपत्रात खोटी, भ्रामक व दिशाभूल माहिती देणे लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कलम १२५अ नुसार गुन्हा आहे.

- Advertisement -

दरम्यान या तक्रारीबाबत आयोगाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे शेवटी शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक यांनी सदर प्रकरणात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २१०, २२३, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कलम १२५अ व मानव संरक्षण अधिकार अधिनियम १९९३ कलम ३० अन्वये सदर याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

दरम्यान २०१९ मध्येही सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणीही आज तारीख मिळाली होती, परंतु सत्तार गैरहजर राहिल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिलीय. सदर याचिकेमध्ये मा. न्यायालयाने तीन वेळा पोलीस तपासाचे आदेश दिले होते. प्राप्त अहवालानंतर प्रथमदर्शनी तक्रारीत तथ्य असल्यामुळे प्रकरणात न्यायालयाने खटला चालवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अब्दुल सत्तार यांना आचारसंहितापूर्वी दि. १९.१०.२०२४ रोजी प्रकरणात जामीन घ्यावी लागली होती. त्यात दि. ३०.११.२०२४ रोजी न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे.

तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर देखील ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, अब्दुल सत्तारांनी शपथपत्रामध्ये खोटी व दिशाभूल करणारी माहिती नमूद केली आहे. शपथपत्रात खोटी माहिती नमूद करणे प्रचलित कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याने सत्तार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केलीय.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...