Saturday, May 4, 2024
Homeनाशिकएमबीबीएस प्रथम वर्ष परीक्षा पुढे ढकला - अभाविप

एमबीबीएस प्रथम वर्ष परीक्षा पुढे ढकला – अभाविप

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाची पार्श्वभूमी व लॉकडाउनमुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे.

- Advertisement -

लॉकडाउनमधील ऑनलाइन शिक्षणामुळे थेअरी व प्रॅक्टिकल ही विद्यार्थ्यांचे होऊ शकलेले नाहीत, असे असतानाही राज्य सरकारने एमबीबीएसची परीक्षा 7 डिसेंबर पासून घेण्याचे घोषित केले आहे. या नियोजित परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलाव्या याबाबतचे निवेदन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना अभाविपने पाठवले आहे.

माहिती देताना अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले की, राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने दिनांक 25 नोव्हेंबर रोजी निर्देश जारी केले आहेत की, की 1 डिसेंबरपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण करून फेब्रुवारी 2021 मध्ये एमबीबीएसच्या परीक्षा घेण्यात याव्यात.

एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम व राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असे बेगडे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या