धुळे (प्रतिनिधी)- शहरासह जिल्हाभरात मतदान उत्साहात सुरू असून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे ५ वाजता एका कंटेनरची तपासणी केली असता त्यात १० हजार किलो चांदीच्या वीटा मिळाल्या आहेत. ३० किलो चांदीची एक वीट अशा ३३६ विटा आहेत. त्याची किंमत ९४ करोड ६८ लाख रुपये इतकी आहे. याबाबत माहिती मिळतात पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. हा माल एचडीएफसी बँकेचा असल्याची माहिती असून पोलिस व्हेरिफाय व पेपर्सची ऑथेंटिसिटी चेक करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिली.
कंटेनरमध्ये आढळल्या ९४ करोड रुपयांच्या १० हजार किलो चांदीच्या विटा

ताज्या बातम्या
Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...
पुणे | Pune
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...