Monday, November 18, 2024
HomeUncategorizedगुजरातमधून नाशकात आलेला तब्बल 'इतक्या' किलोंचा बनावट खवा जप्त

गुजरातमधून नाशकात आलेला तब्बल ‘इतक्या’ किलोंचा बनावट खवा जप्त

नाशिक | प्रतिनिधी

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर मिठाईची दुग्दजन्य पदार्थांची खरेदी केली जाते आहे. मात्र याच मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ (Adultration) केली जात असल्याचे उघड होत आहे. असाच प्रकार शुक्रवारी उघडकीस आला असून नाशिकमध्ये मिठाईत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त माव्याचे प्रमाण (Adulterated Mava) असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मधून दोन खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून द्वारका परिसरात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेसळयुक्त मावा उतरणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती.

टोमॅटोचा बाजारभाव गडगडला; शेतकरी आर्थिक संकटात

त्यानुसार बलदेव ट्रॅव्हल्स व श्रीविजय ट्रॅव्हल्स यामधुन अहमदाबाद, गुजरात येथून सदरचे अन्नपदार्थ वाहतूक करून आणून रॉयल एक्प्रेस ट्रॅव्हल्स यांचे ऑफिसजवळ उतरवण्यात आला. गुजरातहुन आलेल्या दोन खासगी बसमध्ये आणलेला मावा द्वारका येथील ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात उतरवण्यात येत असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत मावा जप्त केला.

हा मावा शहरात तयार होणाऱ्या मिठाईत वापरला जाणार होता. त्या माध्यमातून मिठाई विक्रेते मलाई पेढा, मलाई बर्फी, कलाकंद या सारखे माव्यावर आधारित पदार्थ तयार करणार होते. त्यानुसार शहरातील मिठाई दुकांनांची तपासणी केली. अन्न व औषध प्रशासनाला दाट संशय असल्याने व त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दुधाचा समावेश नसलेल्या अशा पदार्थाची वाहतूक करतांना अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या तरतुदींचा भंग केल्याने या अन्नपदार्थाचा खालीलप्रमाणे साठा अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम राबवून जप्त केला आहे.

Babanrao Gholap : बबनराव घोलप यांना मातोश्रीचा निरोप न आल्याने समर्थक संभ्रमात

त्यात प्रामुख्याने से. अनुष्का स्वीट सप्लायर्स, रविकांत रामदास सिंग, जेलरोड, नाशिक यांचेकडून स्पेशलबर्फी (श्री कन्हैया ) – ११ एचडीपीई बॅग (किंमत रु.४१ हजार रुपये), मे. डीलिशियन स्वीटस् (श्री श्याम) ३ एचडीपीई बॅग ( किंमत रु.११हजार रुपये), हलवा (श्री कन्हैया ) ५ बॉक्सेस (किंमत रु.१७ हजार २९०) असा एकुण रु.६९ हजार २९०रुपयांचा साठा जप्त केला.

त्यानंतर सोनाका अ‍ॅग्रो फुड, व्दारका, नाशिक, मालक संदेश जे. कासलीवाल यांनी मागविलेल्या मिठाईच्या साठयातून रिच स्वीट डिलाईट अनलॉग (राधे) चा २९८ किलो व २५० किलो ( किंमत रु. ७४ हजार ५००) इतका साठा जप्त केला. त्यानंतर सोमाभाई कल्पेश नवरतन गुप्ता, रा. गुरुगोविंद कॉलेजजवळ, इंदिरानगर, नाशिक यांचेकडून गोकुळ (पारंपारीक गोड पदार्थ) चा १४ पॅकेटस, १४८ किलो (किंमत रु.२९ हजार ६००) इतका साठा नमुना घेवून जप्त केला.

यासोबतच लच्छाराम मानाराम चौधरी, मे. महालक्ष्मी स्वीटस्, जेलरोड, नाशिक यांनी मागविलेल्या कलाकंद स्वीटस् याचा नमुना त्यांचेकडून घेवून ५८ किलो(किंमत रु.१३ हजार ९२०) इतका जप्त केला. असा एकुण रु.२ लाख १० हजार ९१० रुपयांचा साठा जप्त करुन ठेवण्यात आला.

Anantnag Encounter : अनंतनागमध्ये ४८ तासांपासून चकमक सुरू, आणखी एक जवान शहीद

दरम्यान, या कारवाईत सहआयुक्त (अन्न) सं.भा.नारागुडे, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे, मनिष सानप व नमुना सहायक विकास विसपुते अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, उमेश सूर्यवंशी,अमित रासकर, प्रमोद पाटील यांनी केली.

दरम्यान या घटनेतून नाशिकमध्ये भेसळयुक्त मावा विक्री केला जात असल्याचे समोर आले आहे. त्या माध्यमातून दुकानांमध्ये मिठाई बनविण्याचे काम होत असल्याने नागरीकांच्या स्वास्थ्याशी हा खेळ असल्याचे अन्न औषध अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले. हा मावा कोणासाठी आणला होता? याचाही तपास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या