Friday, November 22, 2024
Homeजळगावचतुर्थ श्रेणीसाठी कोतवाल कर्मचारी संपावर

चतुर्थ श्रेणीसाठी कोतवाल कर्मचारी संपावर

जिल्हाअध्यक्ष जितेश चौधरी यांचे नेतृत्वात निवेदन

जळगाव – महसुल विभागात कोतवाल हे ऐतिहासीक पद असुन पंरतु मानधनावर काम करणार्‍या पदामध्ये कोतवाल व इतर पदे यांचे कामाच्या जबाबदार्‍यामध्ये खुप मोठी तफावत आहे कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करुन देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष सहाय्य करतो. शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी आजपासून संप पुकारला आहे. दरम्यान यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले.
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोतवाल हा निवडणुक प्रक्रियामध्ये महत्वाच्या कामाची जाबाबदारी पार पाडतो. महसूल प्रशासनात नित्यनियमाची कामे व क्षेत्रीय कामे इमाने इतबार पार पाडतो बरेच ठिकाणी तालुका स्तरावर शिपाई, संगणक चालक, टपाल ने-आण करणे, संकलनाची कामास सहाय्य करणे अशी विविध प्रकाराचे कामे करीत आहे. हया बाबीचा विचार होणे आवश्यक आहे. राज्यातील कोतवाल कर्मचारी यांची कोठेही शासन विरोधी भूमिका नसुन केवळ शासनाचे लक्ष वेधण्याच्या हेतुने हे आंदोलन करीत आहे. त्यानुसार मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यास शासनाच्या विरोधात नसुन केवळ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ सप्टेंबरपासुन राज्यभर कामबंद आंदोलन व दिनांक २६ पासुन आझाद मैदान, मुंबई येथेमागण्या पुर्ण होई पर्यंत धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. दिलीप सावळे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी आदींसह कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या