धुळे | प्रतिनिधी- येथील कंबीर गंज परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत शहर पोलिसांच्या पथकाने दुचाकी चोरट्याला जेरबंद केले. त्यांच्याकडून ७० हजारांच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. तसेच दोन गुन्हयाची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.
शहरातील चंपाबाग, जमनागिरी भिलाटी येथे राहणारे सुरेश धनराज चव्हाण यांची एम.एच.१८ सी.ए. २६५२ क्रमांकाची दुचाकी दि. २४ जुन रोजी जिल्हा रूग्णालयाजवळील दर्गाजवळून चोरीस गेली होती. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कंबीर गंज परिसरात पाण्याची टॉकीजवळील गोडावूनमध्ये छापा टाकला असता एक जण मिळुन आला. त्याने त्याचे नाव पीर मोहम्मद मोहम्मद हनिफ (वय २२ रा.कंबीज गंजख हाफीज सिद्दीकी नगर, धुळे) असे सांगितले. चौकशीत त्याने गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयात वापरलेली त्याची एम.एच.०५. बी.डब्लु. ३६५७ दुचाकी व इतर दोन चोरीच्या दुचाकी काढुन दिल्या. त्यांची जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकुण ७० हजार ९९९ रुपये इतकी आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धिरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ. सुभाष मोरे, पोना बाळासाहेब डोईफोडे, कुंदन पटाईत, रविंद्र गिरासे, पोकॉं मनिष सोनगिरे, प्रविण पाटील, शाकिर शेख, वसंत कोकणी, तुषार पारधी, अमित रनमळे, योगेश ठाकुर, अमोल पगारे यांच्या पथकाने केली.