Thursday, October 1, 2026
Homeक्राईमजावयाने केला सासुचा खून, सासरे गंभीर

जावयाने केला सासुचा खून, सासरे गंभीर

साक्री तालुक्यातील कावठी शिवारातील घटना

धुळे | प्रतिनिधी– क्षुल्लक कारणावरून जावयाने लाकडी दांडक्याने डोक्यात वार करीत सासुचा खून केला. तर सासर्‍याला देखील गंभीर जखमी केले. साक्री तालुक्यातील कावठी शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी जावयावर साक्री पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत जयश्री कैलास सोनवणे (वय २६ रा. दिघावे ता. साक्री व ह.मु खडी के्रशरजवळ, कावठे शिवार ता. साक्री) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे वडील राजेंद्र शांताराम मालचे व आई अरूणाबाई राजेंद्र मालचे (वय ४५ रा. वासखेडी ता.साक्री) हे दोघे काल दि. ६ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जावाई कैलास सुरेश सोनवणे यास समजविण्यास आले होते. त्यांनी त्यास माझी मुलगी जयश्री हिस मारहाण का करता, तिच्या चारित्र्यावर संशय का घेता, अशी विचारणा केली. त्याचा राग येवून जावाई कैलास सोनवणे याने रागाच्या भरात घराजवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने सासरे राजेंद्र मालचे याच्या डोक्यावर वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच सासु अरूणाबाई मालचे यांच्या डोक्यावर देखील दांडक्याने जोरदार वार करीत गंभीर जखमी करून तिचा खून केला. गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...