Tuesday, March 25, 2025
Homeधुळेजिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवा -पालकमंत्री गिरीष महाजन

जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवा -पालकमंत्री गिरीष महाजन

धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक

धुळे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, विद्युत तसेच इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन जिल्ह्यातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिले.

आज धुळे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. महाजन बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. धरती देवरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार फारुख शाह, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमातंर्गत यावर्षी 469 कोटी 56 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गत वर्षांपेक्षा जवळपास 47 कोटी रुपयांचा अधिकचा निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी यावर्षी प्राप्त झाला असल्याने  या निधीतून जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, विद्युत तसेच अन्य विभागाच्या योजनेसाठी  तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करुन 15 ते 20 दिवसात कामे सुरु करावीत. विद्युत वितरण कंपनीने प्रत्येक तालुक्यात नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. राज्य शासनाने कृषी पंपधारकाना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा तसेच प्रधानमंत्री कुसूम योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सौरकृषी पंपाचे वाटप करावे. ज्या ठिकाणी नविन विहीरीचे कामे पुर्ण झाली आहेत अशा ठिकाणी जलदगतीने नवीन जोडणी द्यावी. वलवाडी शिवारात नकाणे तलावातून वाहून येणारे पाणी निचरा करण्यासाठीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. महानगरपालिकेत समावेश झालेली 11 हद्दवाढ गावातील नागरीकांना रस्ते, गटारी, पथदिवे या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. धुळे शहरास दररोज पाणीपुरवठा तसेच सिंचनासाठी अक्कलपाडा धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी  प्रयत्न करावेत. शिंदखेडा व दोंडाईचा नगर पालिकांच्या प्रलंबित विविध विकासकामांना त्वरीत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगल्या प्रकारची दर्जेदार रस्ते तयार करावेत. पोलीस विभागाने धुळे जिल्ह्यातील अंमलीपदार्थ विक्रेत्यांवर कोंबीग ऑपरेशन करावे. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारांवर एमपीडीएअंतर्गत कार्यवाही करावी. असे निर्देशही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा वार्षिक योजनेत सन 2023-2024 या वर्षांत प्राप्त झालेला निधी व खर्च याची माहिती दिली. तसेच सन 2024-2025 या वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेमधील मंजुर नियतव्ययापैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखडय़ासाठी निश्चित केला असून याअंतर्गत जिल्हा वार्षिक कृती आराखडा निश्चित केल्यानुसार विविध विभागामार्फत नाविण्यपूर्ण कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी  जिल्हा वार्षिक योजनेची माहिती दिली. या बैठकीत खासदार, आमदार तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी चर्चेत सहभाग घेवून येणाऱ्या अडचणी अध्यक्षांसमोर मांडल्या. बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...