Saturday, November 23, 2024
Homeधुळेजिल्ह्यात ७७९ वाहने; ११७ हॉटेल, लॉजेसची तपासणी

जिल्ह्यात ७७९ वाहने; ११७ हॉटेल, लॉजेसची तपासणी

सलग तिसर्‍या दिवशी नाकाबंदी, ऑल आऊट ऑपरेशन; वाहनधारकांसह १५२ जणांवर कारवाई

धुळे | प्रतिनिधी

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. त्यात ७७९ वाहने तर ११७ बार, हॉटेल, ढाबे व लॉजेसची अचानक तपासणी करण्यात आली. या मोहिमेत वाहनधारकांसह एकुण १५२ जणांवर कारवाई करण्यात आली. वाहनधारकांकडून ८३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार सलग तिसर्‍या दिवशी दि.५ रोजी रात्री ११ ते दि.६ जुलै रोजी पहाटे ३ वाजेदरम्यान संपुर्ण जिल्ह्यात नाकाबंदी व ऑलआऊट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास देवपूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हद्दपारीत इसम करण ऊर्फ न्हानु सुनिल दगडु मोरे (रा.किसान पाईप फॅक्टरीच्या मागे, देवपूर) हा सक्षम अधिकार्‍यांच्या पुर्व परवानगी शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात धुळे शहरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, नगावबारी परिसरातुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात देवपूर पोलिसात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात १६ पोलिस अधिकारी व ९६ पोलिस अंमलदारांनी एकुण १९ ठिकाणी नाकाबंदी करीत ७७९ दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी केली. ११७ बार, ढाबे, हॉटेल, लॉजेस व गेस्ट हाऊसची तपासणी व चार हिस्ट्रिशिटर तपासण्यात आले. ड्रंक अँण्ड ड्राईव्हच्या २० केसेस करण्यात आल्या. पाच सोडा वॉटर गाडींवर कारवाई करण्यात आली. तर १२७ वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून त्यांच्याकडून ८३ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेदरम्यान स्वत: पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नाकाबंदी पॉइंट, काही हॉटेलला भेट दिली. तर अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी देखील नाकाबंदी ठिकाणी भेटी दिल्या असुन, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस.कृषीकेश रेड्डी, पोलीस उपअधीक्षक भागवत सोनवणे यांनी त्यांचे उपविभागात नियंत्रण ठेवुन नाकाबंदी ठिकाणांना भेटी दिल्या.
मोहिम सुरूच राहणार-आगामी विधानसभा निवडणुका व सण-उत्सवांच्या अनुषंगाने वेळोवेळी नाकाबंदी, कोंबींग व ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. टवाळखोर व असामाजिक घटकांवर प्रभावी कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितल

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या