धुळे | प्रतिनिधी– जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जे.एस.पापळकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. याबाबत अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी आज अध्यादेश जारी केला आहे.
जे.एस.पापळकर हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हाधिकारी, म्हणून यापूर्वी सेवा बजावली आहे. सद्य:स्थितीत ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. शासनाने त्यांची धुळे जिल्हाधिकारीपदी बदली केली असून त्यांचा पद्भार अन्य अधिकार्याकडे सोपवून धुळे जिल्हाधिकारी पदाचा पद्भार घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
जे.एस.पापळकर धुळ्याचे नवीन जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या
Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...
कोल्हापूर | Kolhapur
छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...