Tuesday, March 25, 2025
Homeधुळेजोयदा शिवारात विहीर धसली, दाम्पत्याचा मृत्यू

जोयदा शिवारात विहीर धसली, दाम्पत्याचा मृत्यू

सुदैवाने चिमुकल्यासह महिला बचावली

बोराडी | वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील लालमाटी-जोयदा शिवारात अचानक विहिर धसल्याने दाम्पत्याचा मातीच्या ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला. तर सुदैवाने चिमुकल्यासह महिला बचावली आहे. आज दि. २७ रोजी दुपारी ही घटना घडली.

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील शेतकरी रेबा पांगव्या पावरा (वय ६०) हे पत्नी मीनाबाई (वय ५५) यांच्यासोबत लालमाटी – जोयदा शिवारात शेतात पेरणीचे काम करत होते. त्यादरम्यान त्यांना विहीरीत काही तरी पडल्याचा जोराचा आवाज आला. त्यामुळे दोघांसह संतुबाई भिकला पावरा (वय ५०) ही महिला तिच्या दिड वर्षाच्या मुलासह विहीरीजवळ गेले. त्याचदरम्यान विहीरीचा एक मोठा भाग अचानक ढासळल्याने सर्व विहीरीत पडले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रेबा पावरा व मीनाबाई पावरा ढिगार्‍याखाली दबले गेले. तर संतुबाई पावरा व तीचा दिड वर्षाचा मुलगा बचावले. घटनेनंतर बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. रेबा पावरा आणि मीनाबाई पावरा या दाम्पत्याला मृत अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटेनमुळे सांगवी गावात शोक व्यक्त केला जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...