Saturday, November 23, 2024
Homeधुळेटक्केवारी भोवली; गटशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणेंवर गुन्हा

टक्केवारी भोवली; गटशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणेंवर गुन्हा

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

धुळे । प्रतिनिधी– साक्री पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक (अतिरिक्त कार्यभार) महेंद्र सोनवणे यांना टक्केवारी चांगलीच भोवली. त्यांनी ठेकेदाराला जि. प. शाळांना पुरवठा केलेल्या वस्तुंचे बिल अदा करण्यासाठी एकूण 40 लाख रुपये बिलाच्या 5 टक्के प्रमाणे 2 लाख रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी त्यांच्याविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील ओम साई इन्टरप्राइझेस नावाच्या दुकानदाराने आपल्या फर्म मार्फत समग्र शिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत बुट व पायमोजे पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमार्फत प्राप्त पुरवठा आदेशानुसार साकी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अंदाजे एकुण 40 लाख रूपयांच्या बुट व पायमोजे या वस्तु पुरवठा केल्या होत्या. या अनुदान मागणीच्या फाईल त्यांनी जमा केल्या. या वस्तुंचे बिल अदा करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी महेंद्र सोनवणे यांनी वस्तुंच्या बिल मागणीचे फाईल जमा करून बिल अदा करण्यासाठी एकुण बिलाच्या 5 टक्क्याप्रमाणे 2 लाख रूपये लाचेची मागणी केली. त्यामुळे याबाबत दुकानदाराने दि.30 सप्टेंबर रोजी धुळे एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दि.30 सप्टेंबर व दि.1 ऑक्टोबर रोजी धुळे एसीबीने पडताळणी केली. त्यात महेंद्र सोनवणे यांनी तक्रारदार दुकानदाराकडे एकुण 40 लाख रूपयांच्या बिलाच्या 5 टक्क्या प्रमाणे दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. म्हणून महेंद्र सोनवणे यांच्याविरोधात आज धुळे शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या